महाविकास आघाडीतील 10 ते 12 आमदार संपर्कात; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीतील 10 ते 12 आमदार संपर्कात; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

बच्चू कडू यांच्या संपर्कात आघाडीमधील 10 ते 12 आमदार आहेत. तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच, आगामी काळातील महापालिका, लोकसभा आणि विधानसभेत शिंदे-फडणवीस जिंकणार असा विश्वासही उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. (maharashtra solapur 20 to 22 mla mahavikas aghadi in contact says minister uday samant)

टेंभुर्णीत शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते. त्यावेळी उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले.

टेंभूर्णीतील कुस्ती स्पर्धेसाठी पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मल्ल आले होते. या स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजार कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. मात्र सामंत यांचे भाषण सुरू होताच वीज तोडणीवर बोला असा गोंधळ प्रेक्षकांनी सुरू केला. यावेळी पुरेशा दाबाने वीज पुरवठा केला जाईल असे उद्य सामंत यांनी सांगितले.

येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीतील 10 ते 15 आमदार भाजप, शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कोर्टातील प्रलंबीत खटल्यामुळं पक्षप्रवेश लांबत असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतामध्ये आहे. म्हणजेच 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी, काही फरक पडणार नाही. सरकार आपले कार्यकाळ पूर्ण करेल असेही कडू म्हणाले.


हेही वाचा – गौतम अदानींच्या आर्थिक संकटात वाढ; ‘या’ तीन कंपन्यांनी शेअर्स ठेवले गहाण

First Published on: February 12, 2023 8:58 AM
Exit mobile version