घरअर्थजगतगौतम अदानींच्या आर्थिक संकटात वाढ; 'या' तीन कंपन्यांनी शेअर्स ठेवले गहाण

गौतम अदानींच्या आर्थिक संकटात वाढ; ‘या’ तीन कंपन्यांनी शेअर्स ठेवले गहाण

Subscribe

अमेरिकेतील हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समुहावरील घोटाळ्याच्या आरोपामुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप 100 बिलियन डॉलर पेक्षा जास्त घसरले. अशातच आणखा एक फटका अदानी समुहाला बसला आहे.

अमेरिकेतील हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समुहावरील घोटाळ्याच्या आरोपामुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप 100 बिलियन डॉलर पेक्षा जास्त घसरले. अशातच आणखा एक फटका अदानी समुहाला बसला आहे. अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी त्यांचे समभाग बँकांकडे गहाण ठेवले आहेत. या बँकांनी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला कर्ज दिल्याची माहिती समोर येत आहे. (Gautam Adani Hindenburg Research Three Adani Group companies pledged shares)

या कंपन्यांनी त्यांचे शेअर्स SBICAP ट्रस्टी कंपनीकडे गहाण ठेवले आहेत. SBICAP विश्वस्त कंपनी ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक युनिट आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी बीएसईकडे त्यांचे शेअर्स गहाण ठेवले आहेत.

- Advertisement -

“ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाच्या कारमाइकल प्रकल्पासाठी एसबीआयने (SBI) 300 दशलक्ष डॉलर स्टँडबाय एलसी सुविधा विस्तारित केली आहे. याअंतर्गत तीन समूह कंपन्यांचे काही अतिरिक्त शेअर्स गहाण ठेवण्यात आले आहेत. 140 टक्क्यांच्या आवश्यक संपार्श्विक कव्हरेजचे प्रत्येक महिन्याच्या शेवटी पुनरावलोकन केले जाते आणि कोणतीही कमतरता टॉप अपद्वारे भरली जाते. त्यानुसार गतवर्षी जून आणि जुलैमध्ये टॉप अप करण्यात आले होते आणि तिसरे टॉप अप 8 फेब्रुवारीला झाले होते”, असे एसबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले.

याशिवाय, SBICAP विश्वस्त कंपनीने SEBI कडे त्याचा अहवाल देणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा तारण ठेवलेल्या समभागांच्या संख्येत बदल होतो, तेव्हा ते बाजार नियामकाला कळवावे लागते. यासह, या प्रकल्पातील अदानी ग्रीनच्या तारण समभागांची संख्या 1.06 टक्के, अदानी पोर्ट्स 1.00 टक्के आणि अदानी ट्रान्समिशन 0.55 टक्के झाली आहे. ही केवळ अतिरिक्त संपार्श्विक सुरक्षा आहे आणि यासाठी SBI कडून कोणतेही वित्तपुरवठा करण्यात आलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेतील फॉरेन्सिक फायनान्शिअल कंपनी हिंडनबर्गचा अहवाल आला आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीसंदर्भातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत. या अहवालानंतर शेअर बाजारातही पडझड दिसून आली. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर होते, अहवालानंतर 10 दिवसांत ते पहिल्या 20 जणांच्या यादीतूनही बाहेर पडले आहेत. त्यांनी 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टी; गर्भवती महिलेसाठी लष्कराचा मदतीचा हात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -