वहिनीला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाची हत्या

वहिनीला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाची हत्या

हल्लेखोरांना अखेर अटक

वहिनीला त्रास देण्यावरुन सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. वहिनीला घरगुती वादातून सतत त्रास देत सल्याच्या वादातून भावाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी सचिन मगदूम (२३) या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

कोल्हापूरमधील इचलकरंजी येथील मगदूम एका कुटुंबांतील सख्ख्या भावाने भावाचा खून केला आहे. इचलकरंजीतील लंगोटे मळ्यात ही घटना घडली आहे. नितीन आणि सुमन यांच्यामध्ये सतत घरगुती वाद होत होते. सुमन ब्युटीपार्लरचे काम करत आहे. तिचा पती नितीन तिच्याकडे सतत पैशांसाठी तगादा लावत असे. गुरुवारी रात्री आठ वाजता त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. नितीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान सचिनंने त्याला जाब विचारत भावाला अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे भावांमध्ये वादावादी झाली आणि या दोघांचा वाद शेजारच्या एका व्यक्तीने मिटवला.

अशी केली हत्या

भांडणानंतर घरातील सर्व सदस्य झोपले होते. मात्र नितीनच्या डोक्यात आपल्याला जाब विचारल्याचा राग होता. अखेर त्यांनी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सचिन ज्या ठिकाणी झोपला होता त्या ठिकाणी नितीन गेला. सचिनने क्षणाचा ही विलंब न लावता भावाच्या डोक्यात दगड घातला. नितीन झोपेत असल्याने अचानक झालेल्या हल्ल्यात सुमनच्या पतीचा जागीच मृत्यू झाला. हत्या झाल्यानंतर सचिनने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कसून तपास करत त्याला तीन तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.

वाचा – बारामतीचे बिल्डर दादा सांळुखेचा डोक्यात दगड घालून खून

वाचा – ओरडा चुकवण्यासाठी कुटुबीयांचा केला खून

वाचा – प्रेम प्रकरणातून प्रियकराकडून तरुणाचा खून

First Published on: October 19, 2018 1:05 PM
Exit mobile version