घरमहाराष्ट्रबारामतीचे बिल्डर दादा सांळुखेचा डोक्यात दगड घालून खून

बारामतीचे बिल्डर दादा सांळुखेचा डोक्यात दगड घालून खून

Subscribe

बारामती मधील प्रसिद्ध बिल्डर दादा साळुंखे यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. यामुळे बारामतीमधील व्यावसायिक वर्तुळात खळबळ माजली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उजनी धरण पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता मृतदेहाच्या ठिकाणी चारचाकीच्या वाहनाच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या. यावरून इतरत्र कोठेतरी खून करून मृतदेह पुलाखाली आणून टाकला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशी पटली दादा साळुंखे यांची ओळख

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे टेंभूर्णी पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र साळुंखे यांच्या अंगावरील शर्ट तपासले असता त्याच्या कॉलरवर सिक्वेरा (Sikwera) टेलर्स, बारामती असे लिहिलेले आढळले. यावरुन हा मृतदेह बारामतीमधील असावा असा कयास पोलिसांनी बांधला. हाच धागा पकडून तपास केला असता, संबंधित मृतदेह दादा साळुंखे असल्याचे पोलिसांना कळले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून सांळुखे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉटर्मसाठी पाठवला आहे. हा हत्ये प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून प्रत्यक्षदर्शी, कुंटुंबिय यांची चौकशी सुरु असून सांळुखे यांचे कॉल रेकॉर्डही तपासले जात आहे.

- Advertisement -

स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार दादा साळुंखेनी गुरुवारी रात्री आपल्या पत्नीला फोन करुन काही लोक मला मारत असल्याचे सांगितले होते. मात्र अधिक काही सांगायच्या आतच फोन कट झाला आणि त्यानंतर त्यांचा फोन स्विच्ड ऑफ लागत होता. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन हा खून झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील वंजारवाडी येथे साळुंखे राहत होते.

दादा साळुंखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे माजी अध्यक्षही म्हणून दादा यांनी काम पाहिले होते. त्यांच्या आईने वंजारवाडीच्या सरपंच-उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली होती. दादा साळुंखे यांच्या फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार अजित पवार यांच्यासोबतचे फोटो आहेत.

Dada Salunkhe with Sharad Pawar
दादा साळुंखे शरद पवार यांच्या समवेत
Dada Salunkhe with Ajit Pawar
दादा साळुंखे अजित पवार यांच्यासोबत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -