घरमहाराष्ट्रप्रेम प्रकरणातून प्रियकराकडून तरुणाचा खून

प्रेम प्रकरणातून प्रियकराकडून तरुणाचा खून

Subscribe

एका तरुणीवर प्रेम करणार्‍या दोघांमध्ये वाद झाला. त्यातून एकाने दुसर्‍याला मित्राच्या साथीने बेदम मारहाण केली आणि मृतदेह खाजगी रुग्णालयात सोडून आरोपी पसार झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका तरुणीवर प्रेम करणार्‍या दोघांमध्ये वाद झाला. त्यातून एकाने दुसर्‍याला मित्राच्या साथीने बेदम मारहाण केली आणि मृतदेह खाजगी रुग्णालयात सोडून आरोपी पसार झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नामदेव जाधव असे मृतकाचे तर मुख्य आरोपीचे अक्षय सोनवणे असे नाव आहे. नामदेवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतानाचा आणि मृत्यू झाल्याचे कळताच ते तिथून पसार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. नामदेव आणि अक्षय चाकणच्या एकाच कंपनीत कामाला आहेत. तिथेच असणार्‍या एका तरुणीसोबत अक्षयचे प्रेमसंबंध जुळलेले होते. मात्र दोघांच्यामध्ये नामदेव आला आणि वादाची ठिणगी पडली. दोघांनी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे ठरवले. त्यासाठी शुक्रवारच्या सायंकाळी अक्षय तीन मित्रांसह नामदेवला भेटला.

निर्जनस्थळी मारहाण

एका गाडीत चिंबळी फाट्याजवळील निर्जनस्थळी ते गेले. तिथे नामदेवला झाडाची साली आणि बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत नामदेवला अक्षयच्या घरामागे आणले गेले. तिथे त्या तरुणीला बोलावून, खरे-खोटे करायला सुरुवात झाली. तेव्हा अक्षयने त्या तरुणीलादेखील मारहाण केली. त्यानंतर नामदेवला पुन्हा गाडीत घातले आणि चाकणसह आसपासच्या परिसरात जखमी अवस्थेतच फिरवले.

- Advertisement -

बेशुद्धावस्थेतच फिरवले

रात्री पावणे आठच्या सुमारास नामदेव बेशुद्ध पडला म्हणून भोसरीतल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने सर्व आरोपी तिथून पसार झाले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, एकास अटक अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अक्षयसह चौघांचा शोध सुरु आहे.

नामदेव मुळचा नांदेडचा

नामदेव हा मूळचा नांदेड येथील असून त्याचे कुटुंब पुण्याच्या विमाननगर येथे राहते. तो कामानिमित्त चाकणमध्ये वात्सव्यास होता. नामदेवचे सुरुवातीला एका तरुणीवर प्रेम होते, मात्र तिचा विवाह दुसर्‍या तरुणाशी झाला. कुटुंबियांच्या मर्जीखातर त्याने दुसर्‍या तरुणीशी विवाह केला. पण त्याचे पहिल्या प्रेयसीसोबत विवाहबाह्य संबंध सुरूच होते. त्यामुळे पत्नीने घटस्फोट घेतला. त्यानंतर तो कंपनीतील तरुणीच्या प्रेमात पडला होता. त्यातच त्याची हत्या झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -