सोलापूरात आंदोलन पेटले

सोलापूरात आंदोलन पेटले

सोलापूर तिरडी मोर्चा

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरामध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंसकवळण आले आहे. सकल मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. आज सोलापूरचे मार्केट यार्ड, बाळे ते जुळे सोलापूर व्यापारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन तरुण आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवाजी चौकामध्ये तुफान दगडफेक केली.

शिवाजीचौकात तुफान दगडफेक

सोलापूरच्या शिवाजी चौक, बाळे चौक, हिप्परगा आणि आसरा चौकामध्ये आंदोलनला हिंसक वळण आले. संतप्त झालेल्या तरुणांनी तुफान दगडफेक करत मोठी नासधूस केली. तसंच पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. तर काही ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले आणि रास्तारोको आंदोलन केले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर दगडफेकीचा प्रयत्न करणा-यांना पोलीसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंढरपूरामध्ये ४ एसटी बस फोडल्या

करमाळा येथे सकल मराठा समाज्याच्यावतीने तिरडी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. या मोर्चामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकृती तयार करुन अंत्ययात्रा काढण्यात आली. या मोर्चात मोठा संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. तर सोलापूरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते नवी पेठपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. दरम्यान शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंढरपूर – पुणे महामार्गावर ४ एसटी बस आंदोलकांनी फोडल्या.

First Published on: July 30, 2018 5:34 PM
Exit mobile version