MHADA Lottery : म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल; जाणून घ्या तुमचा गट कोणता?

MHADA Lottery : म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल; जाणून घ्या तुमचा गट कोणता?

`

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत (Income Limit) बदल करण्यात आला आहे. म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे तीन उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. उत्पन्न गटानुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे.

गृहनिर्माण विभागाने बुधवार 25 मे रोजी या संबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तसंच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू असणार आहे. उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणं अत्यंत आवश्यक असते. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत घरासाठी अर्ज भरावे लागतात.

हेही वाचा – माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर बॅकफूटवर, तब्बल ३३ वर्षानंतर म्हाडाला भूखंड परत

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी उत्पन्न मर्यादेत (Income Limit) वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता यापुढे म्हाडाच्या विभागीय मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी ही उत्पन्न मर्यादा लागू होणार आहे. शिवाय, उर्वरित महाराष्ट्रासाठी उत्पन्न मर्यादाही बदलण्यात आली आहे.

त्यानुसार, अत्यल्प गटासाठी वार्षिक 4,50,000 रुपये, अल्प गटासाठी वार्षिक 4,50,001 ते 7,50,000 रुपये, मध्यम गटासाठी वार्षिक 7,50,001 ते 12, 00,000 रुपये आणि उच्च गटासाठी 12, 00,001 ते 18,00,000 रुपयांपर्यंत अशी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा – म्हाडा इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने होण्यासाठी मुद्रांक शुल्काबाबतचे धोरण निश्चित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

म्हाडा सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेनुसार सोडतीतील घरांच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असे क्षेत्रफळ यापुढे लागू असणार आहे.


हेही वाचा – Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी जाणाऱ्या महिला वारकऱ्यांना दिलासा; महिला आयोगाकडून हे निर्णय

First Published on: May 26, 2022 3:10 PM
Exit mobile version