Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, अमूलने सांगितले ‘या’ दरवाढीमागचे कारण

Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, अमूलने सांगितले ‘या’ दरवाढीमागचे कारण

Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा मोठी वाढ, अमूलने सांगितले 'या' दरवाढीमागचे कारण

देशात गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल आणि इतर जीवनावश्यक पदार्थ्यांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होतेय. अशात आता दुधाच्या दरात देखील पुन्हा मोठ होण्याची शक्यता आहे. वीज, आर्थिक खर्च आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल दुधाच्या किमती वाढू शकतात, असे अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले आहे. मात्र हे दर कितीने वाढणार हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

अमूलचे एमडी आरएस सोढी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दुधाच्या किंमती कमी होऊ शकत नाहीत परंतु वाढू शकतात. सहकारी संस्थेने गेल्या दोन वर्षांत दुधाच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ केली आहे, ज्यात गेल्या महिन्यात दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा

पुढे ते म्हणाले की, दुध उद्योगात महागाई चिंतेचे कारण नाही तर या उत्पादनाच्या वाढीव किमतीचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे. अमूल आणि डेअरी क्षेत्राने केलेली वाढ इतरांच्या तुलनेत किंवा इनपुट कॉस्टच्या तुलनेत खूपच मर्यादित आहे.

खर्चात वाढ

दरम्यान वीजेच्या दरात एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढल्या आहेत. याचा परिणाम कोल्ड स्टोरेजच्या खर्चावर होत आहे. लॉजिस्टिक खर्चातही अशीच वाढ झाली आहे. तर यामुळे पॅकेजिंगच्या किमतीतही वाढ होत आहे. या वाढत्या किमतीमुळे दुधाच्या दरात लिटरमागे 1.20 रुपयांची वाढ झाली आहे.

ते म्हणाले की, महामारीच्या काळात शेतकऱ्यांचे प्रति लिटर उत्पन्नही 4 प्रति लिटर झाले आहे. सोढी म्हणाले की, विविध अडचणींमुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे. परंतु नफावसुली हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नसल्यामुळे अमूल अशा दबावांना घाबरत नाही. अमूलला मिळणाऱ्या एक रुपयापैकी 85 पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.


सावधान! Kinder Joy खाल्ल्याने मुलं पडताहेत आजारी, पसरतोय ‘हा’ रोग


First Published on: April 6, 2022 8:28 AM
Exit mobile version