मी दारुचे गुत्ते सुरु करायला सांगितले नाहीत- राज ठाकरे

मी दारुचे गुत्ते सुरु करायला सांगितले नाहीत- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील वाईन शॉप्स सुरू करा अशी मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीका केली होती. या टीकेला खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले असून, मी काय दारुचे गुत्ते सुरु करायला सांगितले नाही असे राज ठाकरे म्हणालेत. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी सर्व प्रश्नाची सडेतोड उत्तरे दिली.

काही जणांना वाटले की मी तळीरामांची बाजू घेतली. यामध्ये तळीरामांचा काय संबंध येतो. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे तात्काळ पैसे कुठून येणार आहेत. काय मार्ग आहेत तुमच्याकडे ? हाच मार्ग आहे दुसरा कोणताच पर्याय नाही. याऐवजी कारखाने उघडा सांगतायत मग उघडा. मी काही दारुचे गुत्ते सुरु करा सांगितले नाही,असे राज ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकांना तुम्ही परवाने दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या आधी काय दारुबंदी नव्हती. ही दुकाने सुरुच होती. हे खाते किती महत्त्वाची आहे ते संबंधितांना माहिती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज्याने या गोष्टींचा विचार करणे देखील गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

राज्यासमोर मोठे आर्थिक संकट –
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊनमुळे राज्यासमोर खूप मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याचे सांगितले. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, मालिका हे सुरु होणार की नाही. लोक थिएटरमध्ये जाणार आहेत की नाहीत? करोनाबद्दल बोलताना त्याच्या भोवतालचा विचारही केला पाहिजे, असे देखील राज ठाकरे म्हणाले. ३ मे नंतर लॉकडाऊन राहणार का? लॉकडाऊन किती काळ पुढे नेणार? लॉकडाऊनमुळे करोना काही मरणार नाही. करोनाने आपल्यातून जाण्याचे तिकीट बुक केलेले नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करुन त्यातून किती रिकव्हर होत आहेत, किती मृत्यू होत आहेत. याकडे लक्ष दिले पाहीजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊन कधी काढणार, हे आता लोकांना कळले पाहीजे, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लॉकडाऊन हटविण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. एवढेच नाही तर भारताने आतापर्यंत अनेक साथीचे रोग पाहीले, ज्यात अनेक बळी गेले होते. करोनापेक्षाही अधिक लोक रस्ते आणि रेल्वे अपघातात लोक मरतात. करोनाने काही आपल्यातून जाण्याची निश्चित तारिख सांगितलेली नाही. त्यामुळे आता करोनाबाबतआपण काळजी घेऊन लॉकडाऊन उघडण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

दुकाने दिवसभर सुरू ठेवा –
सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्यात लॉकडाऊनच्या काळात दुकाने केवळ दोन तास उघडी ठेवण्यावर राज ठाकरे यांनी टीका केली आहे. तुम्ही दोन तास दुकाने कसली उघडी ठेवत आहात? दुकाने दिवसभर उघडी ठेवा, ज्या लोकांना जेव्हा जायचे आहे तेव्हा जातील, रांगेत उभे राहतील, अंतर ठेवून उभे राहतील. मात्र तुम्ही दोन तासच दुकाने उघडी ठेवाल तेव्हा तिकडे झुंबड होते, तेव्हा तुम्ही म्हणतात की कुणी इथे नियमांचे पालन करत नाही. आता म्हणता आम्ही दुकाने बंद करतो, हा कुठचा थिल्लरपणा? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 2, 2020 7:16 AM
Exit mobile version