गजानन कीर्तिकरांच्या मुलाला शिंदे गटाकडून खासदारकीची ऑफर?

गजानन कीर्तिकरांच्या मुलाला शिंदे गटाकडून खासदारकीची ऑफर?

मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना शिंदे गटाने (Shinde Group) खासदारकीची ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गजनान कीर्तिकर अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. त्यामुळे अचनाकपणे एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याने त्यांच्या भेटीबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. (MP Offer for gajanana kirtikar’s son from Shinde group)

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांच्या भेटीला

शिवसेनेचे निष्ठांवत शिवसैनिक अशी ओळख असलेले गजानन कीर्तिकर गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ते लवकरात लवकर बरे होऊन राजकारणात सक्रीय व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या गटात आता फक्त सहा खासदार आहेत. या सहा खासदारांमध्ये गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्या मुलाला खासदारकीची ऑफर दिल्याचे वृत्त समोर आल्याने गजानन कीर्तिकरही शिंदे गटात सामील होणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.


गजानन कीर्तिकर यांच्यावर रहेजा रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी पुर्णतः विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याने एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.

First Published on: July 21, 2022 6:14 PM
Exit mobile version