घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांच्या भेटीला

Subscribe

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांच्या निवसस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांच्या निवसस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान शिंदे आणि कीर्तिकर यांच्या भेटीनंतर गजानन कीर्तीकरही आता शिंदे गटात जाणार का, अशा चर्चांनाही सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. (CM Eknath Shinde meet Shiv sena mp gajanan kirtikar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन राजकिय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याने रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तिकर याना दिलेला होता.

ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यावर त्यांनी स्वतः आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

- Advertisement -

शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर यांच्या पायावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यामुळे कीर्तीकर हे काही काळ राजकारणापासून लांब आहेत. परंतु, बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या गटात ज्या खासदारांनी प्रवेश केला. त्यामध्ये गजानन कीर्तीकर यांचे नाव नाही आहे. त्यामुळे गजानन कीर्तीकर या भेटीनंतर काय भुमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, खासदार गजानन कीर्तीकर हे आजारी असल्याने त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचेही बोलले जात आहे. एखादा नेता किंवा कार्यकर्ता आजारी असल्यास त्याच्या तब्येतीची विचारपूस केली जाते, अशाचप्रकारे शिंदेंनी कीर्तीकरांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय आधीच झाला होता, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -