MSRTC ची पहिली Electric Bus 1 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

MSRTC ची पहिली Electric Bus 1 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

MSRTC ची पहिली Electric Bus 1 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 1 जूनला होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात पहिली इलेक्ट्रिक एसटी बस धावणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान राज्यात पहिली एसटी बस पुणे- अहमदनगर मार्गावर धावली होती. त्याच मार्गावरून आता ही पहिली इलेक्ट्रिक एसटी बस चालवली जाणार आहे. शिवाई या नावाने ही बस चालवण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. दरम्यान गाड्यांचा तुटवडा कमी करण्यासाठी वर्षाखेरीस 3 हजार पर्यावरणपूरक गाड्या एसटी महामंडळात दाखल होणार आहेत.

देशातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये पर्यावरणपुरक इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश वाढवण्यासाठी केंद्राने ‘फेम’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार इलेक्ट्रिक बससाठी केंद्राकडून विशेष सवलत देण्यात येते. केंद्राच्या योजनेअंतर्गत आता एसटी महामंडळाला 1 हजार इलेक्ट्रिक बस आणि 2 हजार सीएनजीवर चालणाऱ्या बस मिळणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 150 इलेक्ट्रिक बस जून महिन्यात दाखल होतील तर वर्षाअखेर एकूण 1 हजार बस दाखल होतील.

शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला सीएनजीचा साठा पाहता मुंबई-पुणे- नाशिक या भागात एसटीच्या बसेस सीएनजीवर चालणाऱ्या असतील. ग्रामीण भागात डिझेलवर चालणाऱ्या एसटी सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या 5 महिने एसटी कर्मचारी विलिनीकरण आणि इतर अनेक मागण्यांसाठी संपावर गेले होते. मात्र सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य करत त्यांनी मनधरणी करत अनेक एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजु केले.
त्यामुळे 2 वर्ष कोरोना आणि नंतर संपामुळे विस्कळीत झालेली एसटी सेवा आता पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आवाहन महामंडळासमोर आहे.


Mumbai Fire : मुंबईतील विलेपार्ले परिसरातील LIC ऑफिसला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

First Published on: May 7, 2022 10:17 AM
Exit mobile version