‘मविआ’मध्ये कोणतीही गडबड नाही, मुख्यमंत्री अनलॉकबाबत योग्य निर्णय घेतील – नाना पटोले

‘मविआ’मध्ये कोणतीही गडबड नाही, मुख्यमंत्री अनलॉकबाबत योग्य निर्णय घेतील – नाना पटोले

'मविआ'मध्ये कोणतीही गडबड नाही, मुख्यमंत्री अनलॉकबाबत योग्य निर्णय घेतील - नाना पटोले

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी १८ जिल्ह्यांमध्ये नियम ५ टप्प्यांत शिथिल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर राज्य सरकारतर्फे हा निर्णय विचारधीन असल्याचे सांगण्यात आले होते. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे गोंधळ झाला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असल्याने मंत्री निर्णय जाहीर करतात असे विरोधकांनी म्हटलं होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही ठीक आहे. मुख्यमंत्री योग्यवेळी योग्य निर्णय जाहीर करतील असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

सरकारमध्ये काही गडबड आहे. एकदम व्यवस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे. मागच्या सरकारचे अनेक उदाहरणे जर काढले तर सुपरमुख्यमंत्री कोण होते ते ही आम्ही पाहिले आहेत. सरकारमध्ये ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्यातील मंत्र्यांनी बोलले तर ते चुकीचे नाही. दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांनी आपले खाते सोडून दुसऱ्याच्या खात्याविषयी भाष्य केले तर चुकीचे आहे.

विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या खात्यातील भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री सगळ्या राज्याचे प्रमुख असतात अशा परिस्थिती योग्य निर्णय घेतील. आता दोन परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या मार्चपासून ते जूनपर्यंतचा कालावधी गेला आहे. यामध्ये अनेक लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत जी काही एसओपी निघेल यामध्ये रोजगार आणि कोरोना रोखण्यास मदत होईल. यावर विचार सुरु असल्याने अनलॉकच्या निर्णयाला उशीर होत आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

समन्वयाचा अभाव आहे असे नाही – जयंत पाटील

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात केवळ वेळेचा अभाव झाला आहे. समन्वयाचा अभाव आहे असे नाही आणि त्यातील मला अधिक माहिती नाही असे सांगतानाच वडेट्टीवार यांना अडव्हॉन्स माहिती कुणी दिली होती का? ते पाहिलं पाहिजे. पण लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय घेते. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णांची वाढती संख्या, भविष्यात येणारी आव्हाने आणि त्या – त्या जिल्हयातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण या सगळ्याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री कार्यालय घेईल असे जयंत पाटील यांनी १८ जिल्हयातील लॉकडाऊनबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

First Published on: June 4, 2021 8:00 PM
Exit mobile version