मच्छिमारांकडून हप्ते घेणाऱ्या शिवसेनेचा निषेध – नारायण राणे

मच्छिमारांकडून हप्ते घेणाऱ्या शिवसेनेचा निषेध – नारायण राणे

नारायण राणे

‘मच्छिमारांकडून शिवसेनेचे आमदार, खासदार हप्ते घेत असतील तर या घटनेचा आम्ही निषेध करतो’, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या या नेत्यांनीच मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोरोस येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमचा वचननामा जनहिताचाच असणार

नारायण राणे यांच्या हस्ते आज दुपारी ओरस येथे पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन झाले आहे. त्यावेळी ते म्हणाले कि, ‘रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार १ एप्रिलला सकाळी साडेअकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल कणार आहेत. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. पक्षाचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार सुभाष पाटील हे ३ एप्रिला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या असून अजूनही काही जागा लढवणार आहोत. तसेच आमचा वचननामा जनहिताचाच असेल, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून समाजाच्या विविध भागातून निलेश राणे यांना पाठींबा मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच २३ एप्रिलपर्यंत प्रचाराची आघाडी कायम राहणार असून निलेश राणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पारंपरिक मच्छिमारच शिवसेनेला धडा शिकवतील. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एलईडी मच्छीमारांच्या विरोधात आहे तर पारंपरिक मच्छिमार जी भूमिका घेतली तीच माझी भूमिका राहील, असही राणे शेवटी म्हणले आहेत.


वाचा – मी एनडीएसोबतच राहणार – नारायण राणे

वाचा – मोदी २०१९ मध्ये पंतप्रधान नसतीलही – नारायण राणे


 

First Published on: March 27, 2019 7:43 PM
Exit mobile version