घरमहाराष्ट्रमोदी २०१९ मध्ये पंतप्रधान नसतीलही - नारायण राणे

मोदी २०१९ मध्ये पंतप्रधान नसतीलही – नारायण राणे

Subscribe

'शिवसेनेने आजवर काहीही काम केलेले नाही पण आता सत्तेसाठी फक्त युती केली', अशी टीका नारायण राणे यांनी औरंगाबादमध्ये बोलतेवेळी केली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे संधी मिळेल तेव्हा विविध मुद्द्यांवरुन राजकीय नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहे. याच धर्तीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं आहे. ‘२०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपतची सत्ता येईल. पक्षाचे २०० हून अधिक खासदारही निवडून येतील. मात्र, पंतप्रधानपदी कोणीही विराजमान होऊ शकतं… कदाचित त्यांनाही पुन्हा संधी मिळू शकते’, अशा खोचक अंदाजात राणेंनी आपलं मत व्यक्त केलं. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे बोलत होते. औरंगाबादमध्ये राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार म्हणून सुभाष किसनराव पाटील निवडणूक लढवतील, अशी घोषणा राणे यांनी केली.

‘तुझं माझं जमेना आणि…’

यावेळी राणे यांनी शिवसेना-भाजपच्या युतीवरदेखील टीका केली. भाजप-शिवसेना युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी असून, त्यांचं ‘तुझं माझं जमेना, तुझ्या विना करमेना’ असं झालं आहे. शिवसेनेने आजवर काहीही काम केलेले नाही पण आता सत्तेसाठी फक्त युती केली’, अशी टीका राणे यांनी आवेळी केली. औरंगाबादला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव होणार असून, सुभाष पाटील निवडून येतील… असा दावाही त्यांनी यावेळी केला.भाष पाटील आधी शिवसेनेत होते, त्यानंतर मनसे आणि नंतर त्यांनी स्वतःची मराठवाडा विकास सेना स्थापन केली. मात्र, आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

‘नाणार प्रकल्प आणणारी शिवसेनाच होती आणि आता त्याला नाही म्हणणारीही शिवसेनाच आहे. मात्र, नाणारला रद्द करण्याचा श्रेय हे आमचे आहे’, असा उल्लेख राणे यांनी यावेळी केला. दरम्यान, आचारसंहिता जाहीर झाल्यावर इतर उमेदवारदेखील घोषित करू असंही नारायण राणेंनी यावेळी पत्रकारांना सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -