घरमहाराष्ट्रनारायण राणेंना धक्का; स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नारायण राणेंना धक्का; स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Subscribe

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणेंना त्यांच्याच कुडाळ मतदार संघात निवडणुकीआधीच धक्के बसायला सुरुवात झाली आहे. कुडाळ तालुक्यातील स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

नारायण राणे. कोकण आणि नारायण राणे हे जणू काही समिकरणच. मात्र २०१४ च्या लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल राणेंना याच कोकणातील जनतेनेच नाकारल्याचे चित्र पहायला मिळाले. आताही ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणेंना त्यांच्याच कुडाळ मतदार संघात निवडणुकीआधीच धक्के बसायला सुरुवात झाली आहे. कुडाळ तालुक्यातील स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आपल्या पदाचे राजीनामे अचानक जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्याकडे पाठवल्याने स्वाभिमानच्या गोटात आता एकच खळबळ उडाली आहे.

राणेंच्या प्रेमापोटी काम करतोय

विशेष म्हणजे स्वाभिमानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नेमके का राजीनामे पाठवले. याबाबत, मात्र उलगडा होत नसल्याने ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमधील नाराजी स्वाभीमानला भोवण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. दरम्यान, याबाबत आपलं महानगरने राजीनामा देण्याचे कारण काय याबाबत प्रमुख पदाधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया देणे टाळले. ‘आम्हाला पदे नको’ अशी भावना काहींची होती कार्य बाहुल्यामुळे आम्हाला वेळ देता येत नाही, अशी भूमिका काही पदाधिकारी घेतली. आम्ही स्वतःच्या पदरची पदरमोड करून लांबून लांबून आमचे नेते नारायण राणे यांच्या प्रेमापोटी काम करतो. मात्र, आम्हाला काही जणांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर पदावर राहणे काय कामाचे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -

कार्यकर्ते राणेंवर नाराज

पक्षश्रेष्ठींकडे काही जणांनी चुकीची माहिती पुरवून काम करीत असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता डायरेक बोलणी खावी लागत असल्याने स्वाभिमानमधील काही कार्यकर्ते दुखावले आहेत. तर, काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांशी मिळून सुद्धा पक्षातील काहीजण विरोधकांशी हातमिळवणी करतात आणि त्यांच्याकडून कामे करून घेतात. आमच्या नेत्यांना चुकीचं सांगतात. त्यामुळे काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तर नारायण राणे यांच्या प्रेमापोटी काहीजण थांबले आहेत. मात्र ही घुसमट किती दिवस करून राहायचे, असे देखील या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता याबाबत पक्षश्रेष्ठी कसा तोडगा काढतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा  – 

- Advertisement -

नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’; ‘लोकसभा स्वबळावर लढवणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -