रायगड पोलिस नारायण राणेंना घेऊन महाडला रवाना, संगमेश्वर पोलिसांकडून घेतला ताबा

रायगड पोलिस नारायण राणेंना घेऊन महाडला रवाना, संगमेश्वर पोलिसांकडून घेतला ताबा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पण या अटकेची मोहीम पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा कामी लागला होता. महाडच्या एका पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर महाडच्या सिद्धेश पाटेकर यांनी ही तक्रार दिली. या तक्रारीनुसारच या गुन्ह्यातील ताब्यात घेण्यासाठीची पोलिसांची टीम सज्ज झाली. पाच जणांच्या टीमने ही ताब्यात घेण्याची कारवाई पार पाडली. दुपारी १४.२५ वाजता नारायण राणेंना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोळवली येथून केंद्रीय मंत्रीपदी असलेल्या नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक यांनी ही संपुर्ण मोहीम फत्त केली. रायगड पोलिसांकडून नारायण राणेंना आता महाडच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी मोठा फौजफाटा घेऊन आता नारायण राणेंना घेऊन निघाला आहे. नारायण राणेंची प्रकृती याआधीच डॉक्टरांकडून तपासण्यात आली होती. नारायण राणेंना आज रात्री उशिरा विशेष दंडाधिकारी न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता आहे.   narayan rane copy

 

रायगडमध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या प्रकरणात रायगड पोलीस अधिक्षक सचिन जौंजाळ यांच्या नेतृत्वातल्या टीम नारायण राणे यांना ताब्यात घेण्यासाठी हजर झाली होती. त्यांच्यासह पोलीस निरीक्षक शैलेश सनस, पोलिस निरीक्षक मिलींद कोपडे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे आणि आमले यांच्या टीमने पत्रान्वये नारायण राणे यांच्या ताब्यासाठी संगमेश्वर पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार नारायणे राणे हे जन आशीर्वाद यात्रेत असताना त्यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यातील गोळवली हद्दीत १४.२५ वाजताच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील कारवाईसाठी रायगड पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन जौंजाळ यांच्या टीमने नारायण राणेंना ताब्यात घेतले आहे.

नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक कार्यकर्ते हे गाडीच्या आडवे पडले होते. तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दीही केली होती. पण पोलिसांना हा जमाव पांगवण्यात यश आले. पोलिसांनी आधीच मोठा फौजफाटा उभारल्याने अखेर नारायण राणे यांना ताब्यात घेऊन पोलिस संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राणेंच्या गाडीचा पाठलाग केला. राणेंना संगमेश्वर पोलिस ठाण्यात त्यांच्याच गाडीतून नेण्यात आले. त्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी नारायण राणे यांचा ताबा हा रायगड पोलिसांकडे दिला.

संगमेश्वर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर भाजपच्या महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील नेत्यांनीही नारायण राणेंच्या कारवाईवर लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते जे पी नड्डा यांनीही याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे.


हे ही वाचा – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल


 

First Published on: August 24, 2021 5:09 PM
Exit mobile version