शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray and Aditya Thackeray) यांच्यामुळेच शिवसेना संपली असून आता शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, असा घणाघात केंद्रीय मत्री नारायण राणे यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे बोलत होते. (Narayan Rane on Shivsena and uddhav Thackeray)

हेही वाचा – ‘हे’ बेडकासारखे आले कुठून? नारायण राणेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं बोचरं प्रतिउत्तर

आमदार, खासदार यांना न भेटणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करणे यामुळेच ठाकरेंविरोधात रोष निर्माण झाला. यामुळेच त्यांचे आमदार फुटले, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे नेण्याचे काम केले आहे. ठाकरेंना मातोश्री दिसायचे आणि राणेंना टार्गेट करायचं, एवढंच काम मुख्यमंत्र्यांना होतं. म्हणूनच हे सरकार कोसळले, असंही ते पुढे म्हणाले.

आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करत आहे. नवनवीन प्रकल्प राज्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच चांगलं काम करतील, असा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल असं म्हटलं आहे. त्यावर भाष्य करताना राणे म्हणाले की, महाराष्ट्रात सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार, हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे पवार यांनी कधी तरी चांगले बोलावे, असा टोलाही त्यांना लगावला.

हेही वाचा – ‘नारायण राणेंना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही’, राष्ट्रवादी आक्रमक

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं थांबवा असं शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आवाहन केलं असतानाच दुसरीकडे एकेकाळी शिवसैनिक असलेले आणि आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी मात्र टीकास्त्र सुरूच ठेवलं आहे.

First Published on: July 9, 2022 11:15 AM
Exit mobile version