घरमहाराष्ट्रसंजय राऊत खुश! कारण... राऊतांच्या ट्विटनंतर नारायण राणेंचे खोचक ट्विट

संजय राऊत खुश! कारण… राऊतांच्या ट्विटनंतर नारायण राणेंचे खोचक ट्विट

Subscribe

राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभव आणि आता एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याचे निश्चित आहे

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होऊ लागली आहे. मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. यात आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने… या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ट्विटमुळे तर विधानसभा विसर्जित करण्याचे मोठे संकेत मिळाले आहेत. राऊतांच्या या ट्विटमुळे शिवसेनेसह, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या गोटात आता प्रचंड हालचालींना वेग आहे. दरम्यान राऊतांच्या महाविकास आघाडी सरकार बरखास्त होण्याच्या संकेतावरून आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, असा आरोप मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

- Advertisement -

संजय राऊतांचे ट्विटमध्ये नेमक काय म्हटले ? 

शिवसेने नेते संजय राऊत यांनी “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..” असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? दिले. त्यामुळे राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होणार असल्याचा तर्क राजकीय वर्तुळा लावण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभव आणि आता एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे सरकार कोणत्याही क्षण पडणार अशी मनाची तयारी आता शिवसेना नेत्यांनी केली आहे. यात हाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनीही आपल्या ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. या सर्व राजकीय नाट्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारही कोसळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -