Nashik Constituency : नाशिकच्या जागेसाठी भाजपा आग्रही; फडणवीसांच्या भेटीनंतर देवयानी फरांदेंचे वक्तव्य

Nashik Constituency : नाशिकच्या जागेसाठी भाजपा आग्रही; फडणवीसांच्या भेटीनंतर देवयानी फरांदेंचे वक्तव्य

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असले तरी अद्याप महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच रविवारी शक्तिप्रदर्शन केले. हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आज (25 मार्च) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  यानंतर माध्यमांशी बोलताना नाशिकच्या जागेसाठी भाजपा आग्रही असल्याचे आमदार देवायानी फरांदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिकची जागा कोणाला मिळणार हे पाहावे लागेल. (Nashik Constituency BJP insists for Nashik seat Devyani Farande statement after meeting Devendra Fadnavis)

हेही वाचा – Baramati Constituency : जी लेक माहेरवाशीण…; सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या वहिनी मैदानात

हेमंत गोडसे यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या प्रश्नावर बोलताना देवयानी फरांदे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आज जर विचार केला तरी नाशिक लोकसभेमध्ये भाजपाचे 3 आमदार आणि महापालिकेत नगरसेवकांची संख्या 25 आहे. तर 100 नगरसेवक नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही सर्व आग्रही आहोत. या विषयात आमचं सर्वाचं एकमत आहे. त्यामुळे आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. आम्ही आज प्रमुख लोकं याठिकाणी आलेलो आहोत. 5 ते 10 हजार पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर समर्थन दाखवायचं असेल तर आम्ही दाखवू शकतो. परंतु ही भाजपाची पद्धत नाही आहे. आम्ही आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवतो आणि वरिष्ठांनी त्याची दखल घेतलेली आहे, असेही देवयानी फरांदे म्हणाल्या.

नाशिकमध्ये भाजपा श्रेष्ठ

गेल्या काही दिवसांपासून आणखी एक पक्ष महायुतीत सहभागी होताना दिसत आहे. तो पक्ष नाशिक आणि शिर्डीची जागा मागताना दिसत आहे? या प्रश्नावर बोलताना देवयानी फरांदे म्हणाल्या की, मेरीट बघता वरिष्ठांनी या विषयाचा विचार करावा, अशी आमची मागणी आहे. जर त्यांची ताकद त्याठिकाणी अधिक असेल तर त्यांना उमेदवारी द्यावी. पण जर नाशिकमधील भाजपाच्या ताकदीचा विचार केला, तर आमचा पक्ष श्रेष्ठ आहे, असे देवयानी फरांदे म्हणाल्या.

हेही वाचा – Nashik Constituency : गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपा आक्रमक; पदाधिकारी घेणार फडणवीसांची भेट

नाशिकच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये संघर्ष?

खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केल्यानंतर नाशिकमधील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपा आमदार देवायानी फरांदे यांच्यासह नाशिकमधील स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी फडणवीस यांची भेट घेत नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेतला पाहिजे, अशी मागणी लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे. धरली.

First Published on: March 25, 2024 7:25 PM
Exit mobile version