घरमहाराष्ट्रBaramati Constituency : जी लेक माहेरवाशीण...; सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या वहिनी...

Baramati Constituency : जी लेक माहेरवाशीण…; सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या वहिनी मैदानात

Subscribe

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यातील आपले उमेदवार घोषित केले असले तरी महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटाने अद्याप जागावाटपासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. असे असले तरी बारामती लोकसभा मतदासंघ राजकीय वर्तुळाच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळेंसाठी पवार कुटुंबातील श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार प्रचार करताना दिसत असकून त्यात आता आणखी नाव जोडले आहे. अजित पवार यांच्या वहिनी म्हणजे शर्मिला पवार या सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसत आहेत. (Baramati Constituency Ajit Pawars sister in law in the field for Supriya Sules campaign)

हेही वाचा – Nashik Constituency : गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपा आक्रमक; पदाधिकारी घेणार फडणवीसांची भेट

- Advertisement -

शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सामील झालेल्या अजित पवारांवर त्यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जोरदार टीका केली होती. अशातच आता श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. बारामतीतील एका गावात प्रचार करताना शर्मिला पवार म्हणाल्या की, आम्ही कित्येक वर्षापासून बारामतीत प्रचार करतो आहोत. प्रत्येकवेळी तुम्हाला आमिष दाखवले जाईल, मटण, बोकड, जेवायला या सगळं सांगितलं जाईल. त्यामुळे एक वाटी मटणाचा रस्सा किंवा कुणाचं बी मटण खावा, पण दाबा फक्त तुतारीचं बटण, नाहीतर एक वाटी रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बस्सा अशा गावरान भाषेत शर्मिला पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या की, वडिलांची पुण्याई (शरद पवार) सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असणार आहे. परंतु त्यांनी कधीही पवार नावाचा वापर स्वत:च्या कामासाठी केला नाही. त्यांना निवडून द्यायचं की नाही हा अधिकार तुमचा आहे. आज काय घडतंय ते तुम्हाला माहिती आहे. आज आपण मुखाने श्रीराम म्हणतो आहोत, पण घराघरात रामायण सुरू आहे की महाभारत? असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Mahayuti Seat Sharing : भाजपाकडून 23 उमेदवार घोषित, 9 ठिकाणी थेट लढत; मात्र शिंदे-अजित पवार गटाचं काय?

माहेरवाशीण लेकीला पुन्हा संधी द्या

शर्मिला पवार म्हणाले की, अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा जो आपल्या माहितीतला उमेदवार आहे. जी लेक माहेरवाशीण आहे तिला पुन्हा एकदा संधी द्या. तुतारी फुंकणारा माणूस हे सुप्रिया सुळे याचं चिन्ह आहे. जे तुमचे बहुमूल्य मत आहे ते सुप्रिया सुळेंना आणि शरद पवार यांना देऊन विजयी करा. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. संसदेत बोलावे लागते, भाषण करावे लागते, तुमच्या लोकांच्या समस्या मुद्देसूद मांडाव्या लागतात. जर ते काम सुप्रिया सुळे चांगले करत असतील तर नवीन उमेदवाराला संधी कशाला द्यायची? असा प्रश्नही शर्मिला पवार उपस्थितांना विचारला.

दुसऱ्याला मत दिले तर पुन्हा पश्चाताप होईल

शरद पवार यांनी आजपर्यंत एकही निवडणूक हरली नाही. मग आता त्या व्यक्तीला हरवायचं का? ते पाप आपण घ्यायचे का? जर आपण दुसऱ्याला मत दिले तर पुन्हा पश्चाताप होईल. एकदा निर्णय घेतला की घेतला. त्यामुळे 4 जूनला सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामतीच्या खासदार झाल्यात अशी गोड बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावर येईल, असा विश्वासही शर्मिला पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -