घरमहाराष्ट्रMahayuti Seat Sharing : भाजपाकडून 23 उमेदवार घोषित, 9 ठिकाणी थेट लढत;...

Mahayuti Seat Sharing : भाजपाकडून 23 उमेदवार घोषित, 9 ठिकाणी थेट लढत; मात्र शिंदे-अजित पवार गटाचं काय?

Subscribe

मुंबई : भाजपाने आपल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांना संधी दिली होती. त्यानंतर आता आपल्या पाचव्या यादीत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील 3 उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपाने आतापर्यंत 23 उमेदवारांना संधी दिली असली तरी त्यांचे मित्र म्हणजेच महायुतीतील शिंदे आणि अजित पवार गटाने अद्यापही एकही उमेदवारी जाहीर केलेला नाही. याशिवाय शिंदे गटाच्या काही जागांवर भाजपाने दावा केला असून नाराज असलेल्या खासदारांचा पत्ता करण्याची मागणी केली आहे. मात्र बंडखोरी करताना शिंदे गटाचा पाठिंबा दिलेल्या 13 खासदारांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा गुंता वाढला असून याची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होताना दिसत आहे. (Mahayuti Seat Sharing 23 candidates declared by BJP direct contest in 9 seats But what about the Shinde Ajit Pawar group)

भाजपाने महाराष्ट्रातून आपल्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील यांच्यासह डॉ. हीना गावित, रक्षा खडसे, रामदास तडस, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुजय विखे पाटील, सुधाकर श्रृंगारे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, बीड, अकोला आणि जळगाव येथे विद्यमान खासदारांऐवजी दुसऱ्यांना संधी दिली आहे, तर आपल्या दुसऱ्या यादीत भंडारा- गोंदियातून सुनील बाबुराव मेंढे, गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना संधी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

काँग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातून 11 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यात कोल्हापूर मतदार संघातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, गडचिरोली नामदेव किरसान, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात 9 ठिकाणी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र महायुतीत आणि महाविकास आघाडीत अजूनही काही जागांवर वाद आहे. कारण भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त कोणही अद्यापही आपल्या उमेदवारांची यादी घोषित केलेली नाही.

- Advertisement -

काही जागांवर वाद, तर काही ठिकाणी चिन्हा चिन्हांची अदलाबदल?

महायुतीकडून अद्यापही अमरावती, परभणी, नाशिक, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, धाराशिव, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. या जागांवर शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवार गटातील खासदार आहेत. मात्र शिंदेंच्या खासदारांवर नाराजी असलेल्या जागांवर भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. यात अमरावती, परभणी, नाशिक, मुंबईमधील तीन जागा, पूनम महाजन यांची जागा आणि कोल्हापूर व हातकणंगलेच्या जागांचा समावेश आहे. या जागांवर शिंदेंचा उमेदवार असणार की भाजपाचा असणार यासंदर्भात अजूनही चर्चा सुरुच आहे. याशिवाय जागांची आणि चिन्हांची सुद्धा अदलाबदल होण्याची शक्यता आहे. शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत. सातारच्या जागेवरून भाजपा आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. जर या जागेवर उदयनराजे यांना तिकिट दिल्यास ते कोणाच्या चिन्हावर लढणार? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास 

रासपाची एक जागा निश्चित

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांची इच्छा होती. त्यामुळे महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. खुद्द शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली होती. याच अनुषंगाने महादेव जानकर आणि शरद पवार यांची भेटही झाली. मात्र, या निमित्ताने होणाऱ्या सगळ्या चर्चा आणि शक्यता मोडून काढत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे जानकर यांनी रविवारी जाहीर केले. त्यामुळे आता महादेव जानकर यांची एक जागा निश्चित झाली आहे. आता महायुतीत त्यांना कोणती जागा मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -