टेनिस बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

टेनिस बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

घरात खेळता-खेळता टेनिस बॉल गिळल्याने दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिवांग संकेत बोराडे (रा. सुगंध बंगला, साने गुरुजी नगर, जेलरोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवांग हा गुरुवारी (दि.१२) सकाळी ९.४५ वाजेदरम्यान घरात खेळत होता. त्यावेळी त्याचे आई-वडील कामात व्यस्त होते. शिवांगने खेळता-खेळता टेनिसचा बॉल गिळला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. ही बाब त्याच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस नाईक कोल्हे करत आहेत.

First Published on: May 13, 2022 11:07 PM
Exit mobile version