तिसऱ्या मुंबईच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांनी सज्ज व्हावे

तिसऱ्या मुंबईच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांनी सज्ज व्हावे

Navi Mumbai Police should be ready for the security of third Mumbai Devendra Fadnavis

नवी मुंबई विमानतळ आणि ट्रान्स हार्बर लिंक तयार झाल्यानंतर तिसरी मुंबई ही नवी मुंबई परिसरात तयार होणार आहे. शहरातील प्रकल्पामुळे उच्चत्तम गुंतवणूक आगामी कालावधीत केली जाणार आहे. नवी मुंबईत देशातील ६५ टक्के डेटा सेंटर क्षमता असल्याने डेटा सेंटर हब बनले आहे. त्यामुळे नवी मुंबईचे पोलिस आयुक्तालयाचे महत्व अधिक वाढण्याबरोबरच आवाहनदेखील वाढणार आहे. याचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना अद्यावत होण्याची गरज असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यासाठी सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासनदेखील फडणवीस यांनी दिले. ( Navi Mumbai Police should be ready for the security of third Mumbai Devendra Fadnavis )

नवी मुंबई पोलिसांच्यावतीने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रयत्नाने नेरुळ सेक्टर-७ मधील सावली सेंटरमध्ये स्वतंत्र जागेत सायबर पोलीस ठाणे व महिला सहाय्यता कक्ष सुरु करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तर वाशीत महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या निर्भया पथकाला झेंडा दाखवून पथक कार्यान्वित करण्यात आले. त्या प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी,विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, आ.गणेश नाईक, आ.मंदा म्हात्रे, आ.रमेश पाटील, आ.महेश बालदी,नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ११२ हेल्पलाईन, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र महिला सहाय्य कक्ष, निर्भया पथक सुरु करण्यासंदर्भातील उद्देश आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केला. नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकामध्ये १० एर्टिगा, ४० अँक्टीव्हा या सशस्त्र महिलांसह शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास गस्त घालणार असल्याचे भारंबे यांनी सांगितले.

महिला सुरक्षेसाठी कटिबंध-रजनीश शेठ

राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कटिबंध असल्याचे सांगितले. त्याच उद्देशाने निर्भया पथक ही संकल्पना राबवली जात आहे. महिलांनी अन्याय झाल्यास पुढे येऊन पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन देखील केले.

( हेही वाचा: पक्षफुटीच्या आधीची घटना ग्राह्य धरा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण )

११२ हेल्पलाईनची जनजागृती करा-रोहित शेट्टी

नवी मुंबई पोलिसांच्यावतीने महिला सुरक्षेच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली.११२ या हेल्पलाईनची अधिक जनजागृती करण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले. तर या उपक्रमाबद्दल पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे कौतुक केले.

First Published on: May 11, 2023 8:12 PM
Exit mobile version