चिपी विमानतळाचं काम आघाडी सरकारच्या प्रयत्नांनी पूर्ण झालं – नवाब मलिक

चिपी विमानतळाचं काम आघाडी सरकारच्या प्रयत्नांनी पूर्ण झालं – नवाब मलिक

सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला होणार असून या विमानतळाचं काम आघाडी सरकारच्या प्रयत्नांनी पूर्ण झालं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मान्यता देण्यात आली होती. आता काम पूर्ण झालं असताना हे काम भाजपमुळे झालं असल्याचं सांगून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. या कामात भाजपची कोणतीही भूमिका राहिलेली नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेटमध्ये मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्यात आला होता. या कामाची सुरुवात एमआयडीसीच्या माध्यमातून झाली. आघाडी सरकारच्या प्रयत्नांनी हे काम पूर्ण झाले असताना भाजपमुळे विमानतळ होत असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचे काम होत आहे, अशी टीका नबाव मलिक यांनी भाजपवर केली आहे.

विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.


हेही वाचा – राणे-ठाकरे येणार एकाच मंचावर; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये रंगणार राजकीय दशावतार?


 

First Published on: September 8, 2021 5:47 PM
Exit mobile version