‘नारायण राणेंना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही’, राष्ट्रवादी आक्रमक

‘नारायण राणेंना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही’, राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी धमकी दिली. नारायण राणे यांनी ट्विट करत बंडखोर आमदारांच्या (Revolt MLA) केसालाही धक्का लागला तर, घरी पोहोचणे कठीण होईल अशी धमकी दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन केले. (ncp Demand for arrest of Narayan Rane who threatened Sharad Pawar)

शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. राणेंनी ट्विटच्या माध्यमातून केलेल्या या वक्तव्यावर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त करीत व्हेरायटी चौकात आंदोलन केले. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खूपसला – उद्धव ठाकरे

या आंदोलनावेळी बर्डी पोलिस ठाण्यामध्ये राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राणे यांच्या बॅनरवरील फोटोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही, असा निर्धारही व्यक्त केला.

राज्यातील राजकीय परिस्थितीवरून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ‘त्यांना घरी पोहोचणे कठीण होईल’ अशी धमकी दिली होती.

काय म्हणाले नारायण राणे?

शरद पवार काय म्हणाले?

“महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण झाली. या अडीच वर्षात आम्ही बऱ्याच संकटांना तोंड दिले. मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता. या काळात या सरकारच्या आरोग्य खात्याने उत्तम काम केले. पण आता हे विधानसभेचे सभासद आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ज्याप्रकारे त्यांनी तिथे नेले गेले त्याची वस्तूस्थिती ते इथे आल्यावर सांगतील. तसेच, ते इथे आल्यानंतर आपण शिवसेनेच्या बरोबर आहोत हे स्पष्ट करतील. त्यानंतर बहुमत कोणाचे आहे हे सिद्ध होईल. विधानसभेत जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा कळेल हे सरकार मेजोरीटी मध्ये आहे की नाही. महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मला विश्वास आहे की शिवसेनेचे आमदार मुंबईत परतले की परिस्थिती बदलेल. बंडखोर आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आहे का? असे विचारला असता एकदम असा निष्कर्ष काढणं योग्य नाही त्यांच्यातल्या काही लोकांची वेगवेगळ्या केंद्रीय एजन्सीकडून चौकशी सुरू आहे किंवा होती, त्यामुळे त्यांच्यावर याचा काही परिणाम झाला नाही असे म्हणता येणार नाही”, असेही पवार यावेळी म्हणाले.

“बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत १२ ते १५ जण होते. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असेही शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपात प्रवेश करणार नाही : योगेश कदम

First Published on: June 24, 2022 11:14 PM
Exit mobile version