मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपात प्रवेश करणार नाही : योगेश कदम

विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ आमदारांनी बंडाळी पुकारली. या बंडाळीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी 'काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको', असा प्रस्ताव त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ आमदारांनी बंडाळी पुकारली. या बंडाळीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको’, असा प्रस्ताव त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य न केल्यास बंडखोर आमदारांचा गट भाजपात सहभागी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र शिंदे यांच्या गटातील एका आमदाराने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी ट्विट करत “भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही”, असे म्हटले. त्यामुळे आता कदमांच्या या ट्विटनंतर नेमकी आता शिंदे गट काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (I am a Shiv Sainik I will not join BJP under any circumstances says yogesh kadam)

दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी ट्विट करत “सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक”, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात वादाची ठिणगी उडाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदारांनी बंड पुकारत शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर मुंबईतील शिवसेना भवनात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी दादरमधील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. सरवणकर यांनीही गद्दारांना क्षमा नाही, असा नारा देत बंडखोर आमदारांविरोधात रोष व्यक्त केला होता. परंतू, या आदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी स्वत: सदा सरवणकर यांनी बंड पुकारला. त्यामुळे संतप्त दादरमधील शिवसैनिकांनी त्यांचा बॅनर फाडला आणि ‘सदा सरवणकर गद्दार’ असल्याचा नारा दिला.


हेही वाचा – सेनेची उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक