जयंत पाटलांना दुसरा धक्का; जिल्हा बँकेची चौकशी करण्याचे राज्य सरकारकडून आदेश

जयंत पाटलांना दुसरा धक्का; जिल्हा बँकेची चौकशी करण्याचे राज्य सरकारकडून आदेश

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. एकीकडे विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना निलंबीत करण्यात आले होते. तर दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

सरकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यामुळे जयंत पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली जिल्हा बँकेवर अनेक वर्षांपासून जयंत पाटीलांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्यांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.

मागील कार्यकाळात मविआ आघाडी सरकार होतं. त्यावेळी मानसिंग नाईक यांना बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत पुन्हा जयंत पाटील यांची बँकेवर सत्ता आली. त्यावेळी मानसिंग नाईक अध्यक्ष झाले. मात्र मागील वर्षी केलेली मागणी या अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी लावून धरत चौकशीची मागणी केली. त्यानुसार सहकार मंत्री अतुल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा : सरत्या वर्षाला निरोप : मुंबई महापालिका स्तरावरील काही घडामोडी


 

First Published on: December 30, 2022 10:33 PM
Exit mobile version