घरताज्या घडामोडीसरत्या वर्षाला निरोप : मुंबई महापालिका स्तरावरील काही घडामोडी

सरत्या वर्षाला निरोप : मुंबई महापालिका स्तरावरील काही घडामोडी

Subscribe

मुंबई: मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी व श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेचा सरत्या वर्षातील अर्थसंकल्प ४६ हजार कोटींच्या घरातील आहे. तर महापालिकेच्या विविध बँकांत तब्बल ९२ हजार कोटींच्या ठेवी जमा आहेत. ज्यावर अंदाजे किमान ६ टक्के प्रमाणे वार्षिक ५ हजार ५२० कोटींचे व्याज पालिकेच्या तिजोरीत जमा होते. मुंबई महापालिका म्हणजे ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ आहे, असा उल्लेख राज्यातील दोन राजकीय नेत्यांनी नुकताच केला आहे. अशा या मुंबई महापालिकेकडून दरवर्षी हजारो कोटींचा खर्च रस्ते, शिक्षण, नदी, नाले रुंदीकरण, उद्यान, मार्केट, पाणी पुरवठा, रूग्णालय सुविधा आदींवर केला जातो.

मुंबई महापालिकेने सन २०२२च्या सुरुवातीपासून ते वर्षाखेरपर्यंत विविध विकासकामे हाती घेतली. त्यापैकी अनेक विकासकामे मार्ग लावली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. पालिकेने या वर्षभरात जी काही कामे केली त्यावर एक दृष्टिक्षेप.

- Advertisement -
  • वर्ष २०२२ हे मुंबईकर नागरिकांसाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या वर्षाच्या सुरुवातीला कोविड मृत्युची शुन्यावर आलेली संख्या ही जणू मुंबई महापालिकेच्या कोविड विरोधातील लढ्यास यश मिळाल्याची पावती होती.
  • त्यापाठोपाठ १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाचा प्रारंभ झाला.
  • राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि मुंबईतील विविध ठिकाणांचे सुशोभिकरण या कामांचीही लक्षणीय प्रगती सरत्या वर्षाने अनुभवली.
  • वर्षअखेरीस मुंबईतील विविध ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यासारखी लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात आली.
  • कोविड लशीच्या मात्रेने ओलांडला १ कोटींचा टप्पा. वर्धक मात्रा देण्यास सुरुवात.
  • पायाभूत सुविधांचा विचार करता सातत्याने प्रगतीपथावर असलेले ‘ कोस्टल रोड’ च्या कामाने या वर्षात अधिक वेग घेत ६७ टक्क्यांपर्यंत कार्यपूर्ती केली.
  • कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) या अंतरासाठी जमिनीखाली खणण्यात आलेल्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण.
  • जागतिक मधुमेह दिनी १ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांची मधुमेह तपासणी.
  • ‘व्हॉट्सअप चॅटबॉट’ सुविधेचा प्रारंभ. या निमित्ताने महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याकरिता मुंबईकरना आणखी एक संवाद पर्याय उपलब्ध.
  • माझगांव परिसरात ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप’ यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून १०० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प करार
  • कुष्ठरोग जनजागृती पंधरवड्यानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.
  • रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दुभाजकांच्या रंगरंगोटीची कामे वेगात.
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष स्वच्छता अभियान.
  • मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३ साठीचा ४६ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर.
  •  चैत्यभूमी परिसरालगत ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युविंग डेक’ चे लोकार्पण.
  • धारावीत मोठ्या सुविधा केंद्रात कपडे धुण्यासह आंघोळी व प्रसाधनगृहांचीही सुविधा
  • अंधेरीतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानास नवीन रुपडे बहाल.
  • क्षयरोग निदान करण्यासाठी सीबीनॅट संयंत्र कार्यान्वित.
  • कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित.
  • पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरास चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल कक्षाचा शुभारंभ.
  • वरळीतील महात्मा गांधी मैदानास (जांबोरी मैदान) विविध सुविधांसह नवीन रुपडे बहाल.
  • मुंबईतील लसीकरणाने ओलांडला २ कोटींचा टप्पा.
  • गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील उड्डाणपुलांचे भूमिपूजन.
  • मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे लोकार्पण.
  • १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे या वयोगटासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ.
  • मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज अभियानाद्वारे विशेष उल्लेखनीय पुरस्कार

• महापालिकेच्या शाळेतील मुलांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ यांच्याशी सामंजस्य करार.

• जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारितील संस्थेद्वारे मुंबईची निवड.

- Advertisement -

• वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षांचे लोकार्पण.

• स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) लगत आणि कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत उभारण्यात आलेल्या दर्शक गॅलरीचे लोकार्पण.

  • मालदीव देशाच्या शिक्षण राज्यमंत्र्यांची महापालिकेच्या शाळांना भेट उपक्रमांचे कौतूक
  • वृक्ष संजीवन मोहिमे अंतर्गत झाडांवरील जाहिरात फलक हटविले, सभोवतालचे काँक्रिट काढण्यासह तब्बल ९४ किलो खिळे झाडांमधून काढले.
  • शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात २ अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहांचे लोकार्पण.
  • ‘सर्वांसाठी पाणी !’ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाचा शुभारंभ.
  • अन्न कच-यापासून वीज निर्मिती करुन त्यापासून वाहन चार्जिंग करणा-या स्टेशनचा शुभारंभ.
  • वरळी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातील जिर्णाद्धार कामांचा शुभारंभ.
  • दादर – धारावी नाल्यावरील जुना पूल तोडून नवीन पूल अवघ्या १७ दिवसांत पूर्ण

• मुंबईतील ३,६७९ मॅनहोलवर संरक्षक जाळी लावण्याचे काम पूर्ण.

  • बहुप्रतिष्ठित ‘अर्थ केअर अवॉर्ड’ ने मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याचा सन्मान.
  • बोरिवली पश्चिम परिसरातील आर. एम. भट्टड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण.
  • सायन रुग्णालयातील रक्त केंद्राला ‘राज्यस्तरिय रक्त दाता गौरव सन्मान’.
  • अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त जाणीव जागृती मोहीम संपन्न.
  • सुप्त क्षयरोगास प्रतिबंध करण्यासाठी आयजीआरए चाचणी करण्यास प्रारंभ.
  • मुंबई महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांना ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ द्वारे नेतृत्व कौशल्याचे धडे.
  • सायन रुग्णालयात मधुमेह व रक्तदाब चाचणी केंद्र स्वतंत्र स्वरुपात कार्यान्वित.
  • सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी रुपये ५ हजार ८०० कोटी एवढ्या अंदाजित खर्चाच्या निविदा आमंत्रित.
  • गणेशोत्सवाच्या अनुषंगाने माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व श्रीगणेश गौरव स्पर्धेचे आयोजन.
  • महापालिकेच्या जलतरण तलावांची सभासदत्व प्रक्रिया ऑनलाईन.
  • मुंबई महापालिकेचे अग्निशमन जवान योगेश बडगुजर व प्रणित शेळके यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असणा-या माऊंट एल्ब्रसवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला.

• आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सल्लागार समिती गठीत.

  • महापालिकेच्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि व्हिजन – २०२५’चे प्रकाशन.

• पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुयोग्यप्रकारे अंमलबजावणी.

  • स्वच्छ समुद्र किनारा मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी.
  • ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेची अंमलबजावणी प्रगतीपथावर.
  • अचानक हृदय बंद पडणे व त्यावरील प्राथमिक उपचार याबाबत जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
  • क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी.
  • नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाची सुव्यवस्थितप्रकारे अंमलबजावणी.
  • जागतिक रेबिज दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचे रेबिज प्रतिबंध लसीकरण.
  • आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी ५० शिक्षकांची नावे घोषित.
  • इमारतीला मुंबई महापालिकेद्वारे देण्यात आलेल्या विविध परवानग्यांची व सुविधांची माहिती एका क्लिकवर.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण. पहिल्या टप्प्यात ५२ ठिकाणी दवाखाने सुरु. एकूण २२० ठिकाणी दवाखाने सुरु करण्याचे नियोजन. सर्व दवाखान्यांमध्ये विविध वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचार व १४७ चाचण्यांची सुविधा.
  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयास १६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा.
  • न्यूमोनिया आजारास प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेचे विशेष अभियान सुरु.
  • महापालिकेच्या अखत्यारितील बांधकाम साहित्याच्या नमुन्यांची चाचणी करणा-या व दर्जा तपासणा-या प्रयोगशाळेस राष्ट्रीय स्तरावरील मानांकन.
  • लहान बालकांमध्ये आढळून आलेल्या गोवर बाधेच्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे लसीकरण.
  • मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाची सुरुवात.
  • मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत विविध ५०० ठिकाणी सुशोभिकरण कामांना सुरुवात.
  • मुंबईतील हरितक्षेत्र वाढविण्यासाठी २ दिवसीय विशेष कार्यशाळेत देशातील ७५ तज्ज्ञ मंडळींचा सहभाग.
  • जी – २० शिखर परिषदेचे यजमानपद प्रथमच मुंबई महानगरीस ! या निमित्ताने मुंबई महापालिकेतर्फे विविध स्तरिय कार्यवाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -