शरद पवारांवर टीका करण्याची तुमची उंची नाही, निलेश लंकेंचं विखे पाटलांना प्रत्युत्तर

शरद पवारांवर टीका करण्याची तुमची उंची नाही, निलेश लंकेंचं विखे पाटलांना प्रत्युत्तर

शरद पवारांवर टीका करण्याची तुमची उंची नाही, निलेश लंकेंचं विखे पाटलांना प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील राजकारणात महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट- भाजप असे दोन विरुद्ध दुवे एकमेकांवर टीका टीप्पणी करताना दिसतात. दरम्यान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला. भु-विकास बँकेच्या कर्जमाफीवरून पवारांना टोला लगावला होता. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय घडलं ?

राज्याचे महसूलमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील हे शेवगाव आणि पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकाची पाहाणी करण्यासाठी आले होते. त्यांच्या याच दौऱ्यावर पारनेर मतदारसंघांचे आमदार निलेश लंके यांनी समाचार घेतला. “विखे पाटील यांचा दौरा म्हणजे केवळ पर्यटन दौरा असल्यासारखा होता. फक्त दोन तासांचा धावता दौरा त्यांनी केला. त्यातच त्याांनी दौऱ्यावेळी हार तुरे स्वीकारले हे बरोबर नाही, एकीकडे शेतकरी खचला असताना तुम्ही सत्कार स्वीकारता”

विखे पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर निलेश लंकेंच प्रत्युत्तर

मागच्या काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारकडून भूविकास बँकेत ज्या कर्जदारांचे कर्ज थकीत आहेत त्या शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केल्याची घोषणा केली याच मुद्यावर शरद पवारांनी भाष्य केलं होतं. आणि राज्य सरकारवर टीका केली. दरम्यमान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार करत भूविकास बँकेंच्या निर्णयावरुन निशाणा साधला. यावर लंकेंनी पलटवार करतांना म्हंटलय की, “शरद पवार हे तुमच्यासारखे हेलिकॉप्टरने दैरा करत नाहीत. त्यांच्यावर टीका करण्याची तुमची उंची नाहीये.”
या टीका-टीप्पणीच्या राजकारणामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा पारनेर दौरा चांगलाच चर्चेत आलाय.

_________________________________

हे ही वाचा – निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला दणका, अडीच लाख प्रतिज्ञापत्रे केली बाद

First Published on: October 26, 2022 12:30 PM
Exit mobile version