भुजबळांच्या अडचणीत वाढ; एमईटीमधील राजकीय बैठकीवरून मिळाली नोटीस

भुजबळांच्या अडचणीत वाढ; एमईटीमधील राजकीय बैठकीवरून मिळाली नोटीस

माज उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या वांद्रे येथील संकुलात राजकीय बैठक घेणे हे अवैध असल्याचा आरोप करत या संकुलाचा पुन्हा असा गैरवापर केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देणारे पत्र संस्थेचे आजीव विश्वस्त सुनील कर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तसेच त्यांच्या कुटुंबियांना पाठवले आहे. या प्रकरणी छगन भुजबळ, त्यांची पत्नी मीना, पुत्र पंकज, पुतणे समीर भुजबळ यांना सुनील कर्वे यांनी पत्र पाठवले आहे. तसेच त्याची प्रत धर्मादाय आयुक्तांना पाठवण्यात आली आहे.

या आहे पत्रामध्ये 

मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या वांद्रे येथील संकुलात १४ नोव्हेंबर रोजी राजकीय बैठक घेतल्याने बातम्यांमधून समजले. तुमचे हे कृत्य पूर्णपणे चुकीचे आहे. वैयक्तिक व राजकीय लाभासाठी संस्थेच्या मालमत्तेचा व निधीचा हा गैरवापर आहे. ही शिक्षण संस्था असल्याने या जागेचा इतर कारणासाठी वापर करणे हे अवैध कृत्य ठरते, असेही कर्वे यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर एमईटीच्या जागेचा पुन्हा असा गैरवापर केल्यास तुम्हा सर्वांविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही कर्वे यांनी या पत्रात भुजबळ यांना दिला आहे.

हेही वाचा –

संजय राऊत यांनी केली ‘ही’ शायरी ट्विट; म्हणाले ‘याद मुझे दर्द पुराने नही आते’!

First Published on: November 16, 2019 2:45 PM
Exit mobile version