घरमुंबईसंजय राऊत यांनी केली 'ही' शायरी ट्विट; म्हणाले 'याद मुझे दर्द पुराने...

संजय राऊत यांनी केली ‘ही’ शायरी ट्विट; म्हणाले ‘याद मुझे दर्द पुराने नही आते’!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊत, आज मात्र माध्यमांसमोर येणार नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य ते बोलेन अशी, प्रतिक्रिया राऊत यांनी यावर दिल्याचे समजते

शिवसेना नेता संजय राऊत यांनी आजही त्यांच्या ट्विटर हँडलवरून शायरी, कविता ट्विट करण्याचा सिलसिला सुरु ठेवला आहे. आज, शनिवारी त्यांनी प्रख्यात शायर बशीर बद्र यांची एक लोकप्रिय शायरी ट्विट करून सध्याची त्याची स्थिती त्यातून व्यक्त केली आहे. यारो नये मौसम ने ये एहसान किया है, याद मुझे दर्द पुराने नही आते – बशीर बद्र, असे या ट्विटमध्ये नमूद केले आहे. काल, १५ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी वयानुसार बोलण्यातही परिपक्वता यावी, असा पलटवार संजय राऊत यांच्यावर केला.

- Advertisement -

संजय राऊत यांनी काल केलेले ट्विट –

- Advertisement -

आज प्रसार माध्यमांशी बोलणार नाही – राऊत 

गेल्या काही दिवसांपासून दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधणारे संजय राऊत, आज मात्र माध्यमांसमोर येणार नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य ते बोलेन अशी, प्रतिक्रिया राऊत यांनी यावर दिल्याचे समजते. जे काही बोलायचे आहे ते सामनाच्या अग्रलेखात मांडले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही, याला दुजोरा संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा –

घोडेबाजार भरवण्याचे भाजपाचे मनसुबे; ‘सामना’ अग्रलेखातून जहरी टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -