‘स्टेरॉइड’मुळे होणार व्यायामशाळांची तपासणी, राज्य सरकारचा कारवाईचा बडगा

‘स्टेरॉइड’मुळे होणार व्यायामशाळांची तपासणी, राज्य सरकारचा कारवाईचा बडगा

'स्टिरॉइट'मुळे होणार व्यायामशाळांची तपासणी, राज्य सरकारने दिले कारवाईचे आदेश

आरोग्य हीच संपत्ती आहे. परंतु ते टिकविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉटकर्ट नको…! चित्रपटातील अभिनेत्यासारखे पिळदार आणि सिक्स पॅक असलेले शरीर असावे, यासाठी बहुतेक तरूण बॉडी बनविण्यासाठी कृत्रिम औषधांचा वापर करतात. आणि हाच शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेततो. नुकतेच विधानसभेत याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्वच व्यायामशाळांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. व्यायामशाळेमध्ये स्टेरॉइड घेतल्याने मुंब्रा आणि कल्याण येथील दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तर अलीकडेच कुर्ल्यातील एका युवकाला आपल्या दोन किडन्या गमवाव्या लागल्या आहेत.

विधानसभेत हा मुद्दा उचलण्यानंतर राज्यभरातील सगळ्याच व्यायामशाळेची तपासणी करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. येत्या सहा महिन्यात राज्यातील व्यायामशाळेची तपासणी केली जाणार आहे. थोड्या कालावधीत पिळदार शरीर कमविण्यासाठी व्यायामशाळेमध्ये तरूणांना स्टेरॉइड हे धोकादायक दिले जात असल्याचे समोर आले आहे. स्टेरॉइडची आॅनलाईन विक्री थांबविण्यासाठी स्वतंत्र कायदा आणता येईल का? याबाबत सरकार विचार करत आहे.

योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्या…

शरीर पिळदार बनविण्यासाठी मेहनत करावी. त्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास कृत्रिम औषधांची गरज भासणार नाही, असे मार्गदर्शन तज्ज्ञ करत आहेत. भारतात बंदी असलेली औषधे परदेशातून आयात केली जातात. त्यामुळे विक्रीवर बंधने आणण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळ्या थाटणीचे असते. अशावेळी सर्वजण एकाच तऱ्हेचे सप्लिमेन्ट घेतात. तर हे चुकीचे आहे. सरकारने फक्त तपासणी न करता त्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जाते आहे.

First Published on: March 6, 2020 12:43 PM
Exit mobile version