OBC Reservation : आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती, पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर निशाणा

OBC Reservation : आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती, पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर निशाणा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मी आधीच उपाशी आणि त्यात आजच उपास म्हणजे बहुजनांसारखी अवस्था झाली आहे. जेव्हा आपल्याला हक्क पाहिजे होते तेव्हा मिळाला नाही. जेव्हा आपल्याला समानता पाहिजे होती, मंच पाहिजे होता मंच मिळाला नाही. असं उपाशी ठेवलं ठेवलं आणि जेव्हा आपल्याला मिळेल असं वाटत होत तेव्हा आपल्याला उपाशी ठेवण्यात आलं असे उदाहरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. भाजपने ओबीसी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात पंकजा मुंडेंनी राज्य सरकारमुळेच आरक्षण गेलं असल्याचा आरोप केला आहे.

अनेक वर्ष राजकारणात असे गेले की, लोकं आपली आडनावं बदलून लावायचे त्यात कळायचे नाही की त्याची जात कोणती आहे. भाजपमध्ये असं लावा, राष्ट्रवादीत असं लावा आणि काँग्रेसमध्या गेलं की असं लावा अशी परिस्थिती होती. जातीवाद होता अजूनही गावात जातीच्या भींती संपुष्टात आल्या नाही. अजूनही गावात गेलं की वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जावं लागते. अशी परिस्थिती आहे. संतांचा महाराष्ट्र आणि पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात ओबीसींची परवड का ? असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

बहुजन म्हणजे जास्त संख्येनं असलेला बहुजन आजही जातीपातीच्या बळावर गावांमध्ये अत्याचार होतात असे पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक ताकद नाही अशा लोकांना १० टक्के आरक्षण दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस होते त्यावेळी ओबीसींचे ५० टक्केचे आरक्षण करण्याचे डोक्यात होते परंतु हे सरकार आल्यानंतर ते ५० टक्क्यांच्या खालचेही आरक्षण गेलं आहे. मराठा आरक्षणही ज्या मुख्यमंत्र्यांची जात काढण्यात आली त्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या समोर टांगती तलवार देण्याचे काम केलं आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे साहेबांना प्रश्न विचारला जात, पात धर्म यामध्ये घडले नाही तुमच्या राजकारणाचे मूळ काय त्यांनी सांगितले जो मंचावर नाही, जो सत्तेवर नाही, जो वर्षानुवर्षे आपले जोडे आपल्या काखेत घेऊन मुजरा करत होता त्याला सत्तेत बसवले हे माझ्या जीवनातले मूळ आहे. आज बबनराव असते तर म्हणाले असते आमदार खासदार बनवणारी फॅक्टरी म्हणजे गोपीनाथ मुंडे होते.

मराठा आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे

मराठा समाजाला आरक्षण हवं आहे परंतु ते शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांमध्ये पाहिजे आहे. ओबीसींची राजकीय आरक्षणाची मागणी आहे. मराठा आणि ओबीसींच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. राज्य सरकारने अध्यादेश टीकवून दाखवावा आणि येणाऱ्या निवडणुका करुन दाखवाव्यात मग तुमचै कौतुक करु असे आव्हानच पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देऊन निवडणुका झाल्या ओबीसींवर अन्याय झाला परंतु येत्या निवडणुकांमध्ये असा अन्याय होणार नाही असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलवर आयकरचे छापे; महाराष्ट्रातील ‘या’ राजकीय नेत्याशी कनेक्शन


 

First Published on: October 12, 2021 3:49 PM
Exit mobile version