माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात अडथळा; लोको-पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ

माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात अडथळा; लोको-पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ

पर्यटकांचे फिरण्यासाठी असलेल्या माथेरान मध्ये एक घटना घडली आहे. माथेरान मिनी ट्रेनच्या (matheran mini train) मार्गात लोखंडी रॉड ठेऊन ट्रेनचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार ट्रेनचा अपघात घडविण्यासाठी करण्यात आला होता की ही पर्यटकांनीच केलेली मस्ती होती. याचा शोध सुरु आहे. दरम्यान लोको पायलटच्या प्रसंगावधामुळे माथेरान मिनी ट्रेनचा अपघात टळला आहे. रेल्वे पोलीस या संदर्भांत अधिक चौकशी करत आहेत. अज्ञातांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच नेरळ माथेरान नेरळ (neral – matheran – neral) अशी माथेरान टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत सुरू झाली. मात्र या विकेंडला सायंकाळी माथेरान स्थानकातून नेरळच्या दिशेने ट्रेन सुटली होती. दरम्यान ही ट्रेन 140 नंबरवरील वॉटर पाईपमार्गावर आली. यावेळी रेल्वे रुळावर कोणी अज्ञातांनी लोखंडी रॉड ठेवले होते. दरम्यान याच मार्गावरून ट्रेन जात होती यावेळी वेळीच लोको पायलट दिपचंद मीना आणि अल्प सुधांशू यांच्या लक्षात येताच. त्यांनी तातडीने ट्रेन थांबवली यामुळे पुढील मोठा अनर्थ होता होता टळला.

मागील तीन वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 22 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत पुन्हा रुजू झाली. दिवसभरात अप आणि डाऊन अशा चार फेऱ्या या ट्रेनच्या होतात. नेरळ ते माथेरानबरोबरच अमन लॉज ते माथेरान अशा शटल सेवाही चालवण्यात येते. सध्या प्रत्येकी सहा डब्यांच्या तीन मिनी ट्रेन आहेत.

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता माथेरान-नेरळ (matheran – neral) अशी मिनी ट्रेन (mini train) घाटातून जात असतानाच या ट्रेनच्या मार्गावर रॉड ठेवण्यात आला होता. हा रॉडचा तुकडा म्हणजे रुळांखाली वापरण्यात येणारा लोखंडी स्लीपर्स होता. हा तुकडा पाहताच मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश आणि सहायक लोको पायलट सुधांशु यांनी प्रसंगावधान दाखवून मिनी ट्रेन थांबवली आणि अनर्थ टळला.


हे ही वाचा – मराठवाड्यातून पॉप्युलर फ्रंटच्या 9 जणांना अटक, विविध महत्त्वाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल 

First Published on: November 1, 2022 3:08 PM
Exit mobile version