अरे वा! उद्या मुंबईत बिनधास्त फिरा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘नो मेगाब्लॉक’

अरे वा! उद्या मुंबईत बिनधास्त फिरा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘नो मेगाब्लॉक’

संग्रहित छायाचित्र

No Mega block On Sunday | मुंबई – दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी दर रविवारी मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येतो. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक (Railway Timetable) कोलमडून सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. मात्र, उद्या रविवारी प्रवासी बिनधास्त फिरू शकता. कारण, उद्या रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेणार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (No Mega block On Sunday)

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, मध्य रेल्वेच्या (Central Railway) खडवली ते आसनगाव या स्थानकांदरम्यान शनिवार-रविवारी मध्यकालीन मेगाब्लॉक (Midnight Mega block) घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांना लेटमार्क लागू शकतो. शनिवारी मध्यरात्री २ वाजून पाच मिनिटांनी ते ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत खडवली ते आसनगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे या दरम्यान केली जातील.

हेही वाचा – प्रवाशांना मिळणार फक्त Confirm Ticket, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून होणार जुगाड

मध्यकालीन ब्लॉकमुळे काय होईल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आज रात्री सव्वाबारा वाजता सुटणारी कसारा लोकल ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर, कसारा येथून पहाटे सव्वातीन वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोक ठाण्यातून सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा – कोकण रेल्वेच्या 37 स्थानकांचे होणार सुशोभीकरण, प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा

लांब पल्ल्लयांच्या गाड्यांवरही परिणाम

ट्रेन क्रमांक २०१०४ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक १८०३० शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल नागपूर मार्गे
ट्रेन क्रमांक १२१५२ शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस.
ट्रेन क्रमांक ११४०२ आदिलाबाद – मुंबई एक्सप्रेस

First Published on: January 28, 2023 8:28 AM
Exit mobile version