संभाजीराजे छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका : पंकजा मुंडे

संभाजीराजे छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका : पंकजा मुंडे

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Raut) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या बाबतीमध्ये जी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. आम्ही एका छत्रपतींना राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवलं, तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेवर पाठवा. संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje Chhatrapati) मान खाली घालायला लावू नये, असा निर्णय घ्यायला पाहिजे, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, संभाजी राजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेनेने म्हटले होते. परंतु संभाजी राजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेवर संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच मराठा मोर्चाकडून संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारण्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे.

ते छत्रपती आहेत त्यांचा मान राखायला पाहिजे

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवावे, ते छत्रपती आहेत त्यांचा मान राखायला पाहिजे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये माझा सहभाग असतो. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे मी तेवढ्याच स्थितप्रज्ञने बघत आहे. लोकांना गोड वाटेल अशा घोषणा करायच्या आणि त्यातून आपणही लोकप्रिय व्हायचं अशा पद्धतीचे राजकारण ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात झालं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्रात देखील ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून द्यावे

मध्य प्रदेश सरकारने जे केलं ते पाहण्यासाठी सरकारने आपली लोकं मध्यप्रदेशमध्ये पाठवावीत. त्याचा अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात देखील ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, अशी माझी भूमिका आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय, संभाजीराजेंच्या भावनेवर चर्चांना उधाण


 

First Published on: May 26, 2022 5:21 PM
Exit mobile version