परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी, सर्व आरोप खोटे असल्याचा दावा

परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी, सर्व आरोप खोटे असल्याचा दावा

परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. परंतु परमबीर सिंह आज(गुरूवार) मुंबई पोलिसांपुढे हजर झाले आहेत. तसेच त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्यासाठी सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी करण्यात आली आहे. परंतु परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडले. सिंह यांची या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली.

सिंग यांनी खंडणी मागितल्याचे आरोप बिमल अग्रवाल यांनी केले होते. तसेच सचिन वाझे यांनी पैसे मागितल्याचा आरोपही अग्रवाल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे सचिन वाझे आणि बीमल अग्रवाल यांच्यातील संभाषणाबद्दल चौकशी करण्यात आली. विमल अग्रवाल आणि सचिन वाझे ऐकमेकांशी हॉटेल मालकांच्या पैशांबद्दल बोलत आहेत. अशा प्रकारचं संभाषण ऑडियो क्लिपच्या माध्यमातून समोर आलं होतं. परंतु माझा या संभाषणाशी कुठलाही संबंध नसल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मी बीमल अग्रवाल यांना ओळखत नाही. तुम्ही हे प्रश्न सचिन वाझे यांना विचारा. हे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणत्याही पैशांची मागणी केली नाही. असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. आजच्या चौकशीमध्ये १२ युनिटचे अधिकारी बोलावण्यात आले होते. परंतु त्यांना परत पाठवण्यात आलं. युनिट ११ चे अधिकारी व डीसीपी यांनी त्यासंबंधीत माहिती मागितली आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आता एजन्सी आणि एसआयटी समोर जावं लागू शकतं. चांदिवाली कमिशनकडूनही त्यांची चौकशी केली जाऊ शकते. परंतु परमबीर सिंग यांच्यावर लावण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याला पैसे वसूलीसाठी सांगितलेलं नाहीये. मात्र, परमबीर सिंग यांना इतर कोणत्या व्यक्तीने आदेश दिले का? यावर देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे.


हेही वाचा: पाकिस्तानच्या विद्यार्थ्याकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी?, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ


परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणी आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांना फरार देखील घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देखील देण्यात आली होती. परंतु ते हजर झाले नव्हते.

First Published on: November 25, 2021 7:17 PM
Exit mobile version