पवार, शेलार पॅनलचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

पवार, शेलार पॅनलचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

पवार, शेलार पॅनलचे अमोल काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. अमोल काळे यांना 181 मते मिळाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक गुरुवारी झाली. एमसीएच्या निवडणुकीसाठी 380 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 181 मते मिळाली आहेत. संदीप पाटील यांना 158 मते मिळाली आहेत. त्यामुळे अमोल काळे यांचा 23 मतांनी विजय झाला आहे. (Pawar, Shelar panel’s Amol Kale new president of Mumbai Cricket Association)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी संध्याकाळी सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीला मिलिंद नार्वेकर, अजिंक्य नाईक, अभय हडप हे 3 उमेदवार पुढे असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात लढत झाली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले, अभय हडप, समद सूरज, मंगेश साटम, संदीप विचारे आणि प्रमोद यादव यांचा समावेश झाला आहे.

343 पैकी 180 पेक्षा जास्त मते मिळाल्यानंतर निकाल औपचारिकपणे जाहील होण्याआधीच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला स्वागत केले. अमोल काळे हे मागच्या तीन वर्षांपासून एमसीए मध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडे उपाध्यक्षपद होते.

अखेर काही तासांनी या निवडणुकीचा निकाल लागला आणि पवार, शेलार पॅनलचे उमेदवार अमोल काळे यांना विजयी घोषित करण्यात आले. अमोल काळे यांची एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचा पॅनलने एकत्र निवडणूक लढवली. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात लढत झाली.

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संदीप पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमोल काळे यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच “या निवडणुकीसाठी एकत्र आलेले राजकारणी पुढेही एकत्र राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. मला आनंद आहे की माझ्यामुळे राजकारणी एकत्र आले, एकत्र राहणे महत्वाचे असते, मुंबईचं क्रिकेट महत्वाचं आहे. संदीप पाटील महत्वाचा नाहीये” असे त्यांनी म्हटले.


हेही वाचा – फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्लांना अभय; खडसेंनी दिले होते क्लीनचिटचे संकेत

First Published on: October 20, 2022 8:49 PM
Exit mobile version