नारायण राणेंच्या ‘त्या’ फोटोचे भास्कर जाधव यांच्याकडून कौतुक!

नारायण राणेंच्या ‘त्या’ फोटोचे भास्कर जाधव यांच्याकडून कौतुक!

मुंबई – भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीसह लक्ष्मी आणि गणपतीचाही फोटो लावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी भारतीय चलनी नोटांवर कोणाचा फोटो लावू शकतो यावर आपआपली मते मांडली आहेत. त्यातच, एका २५ पैशांच्या नाण्यावर भाजपा नेते नारायण राणे यांचा फोटो लावल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच, हे फायनल करा अशी मागणीही या मीमद्वारे करण्यात आली होती. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर जाधव यांनीही हे नाणे एडिट करणाऱ्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – हा ‘स्नेह’ इतरवेळी कुठे अदृश्य होतो? वानखेडेवरील सर्वपक्षीय स्नेहभोजनावर शिवसेनेचा हल्लाबोल

भारतीय चलनी नोटांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा अशी मागणी करण्यात येत आहे. तसंच, त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी अशा विविध नेत्यांच्या फोटोंचीही मागणी करण्यात येतेय. यातच, एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २५ पैशांच्या नाण्यावर भाजपा नेते नारायण राणे यांचा फोटो एडिट करण्यात आला आहे. तसंच, तो फोटो पोस्ट करताना हे फायनल करा अशी कॅप्शनही टाकण्यात आली आहे. ही पोस्ट करणाऱ्याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या सर्व प्रकरणावर भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्यालाकुणाला ही कल्पना सुचली असेल त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, असं भास्करजाधव म्हणाले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – अखेर ‘ती’ आलीच! पावसामुळे नव्हे तर ‘लानीना’मुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत थंडीला सुरुवात

First Published on: October 30, 2022 9:29 AM
Exit mobile version