पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी, चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, संजय राठोडांचा खुलासा

पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी, चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, संजय राठोडांचा खुलासा

पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी, चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, संजय राठोडांचा खुलासा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड हे आज पत्नीसह पोहरादेवी गडावर पोहचले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परीषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘पूजा चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल संपूर्ण बंजारा समाजाला दुःख झाले आहे. तिच्या कुटूंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. परंतु पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन ज्याप्रकारचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे. मी मागासवर्गीय, विमुक्त भटक्या कुटूंबातून, ओबीसीचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या ३० वर्षापासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्धवस्त करण्याचा वाईट प्रकार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे.

आपण सर्वजण प्रसार माध्यम, समाज माध्यमात जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीत काहीही तथ्य नाही. या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. पोलीसांच्या तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. परंतु अशा पद्धतीने माझी आणि समाजाची गेल्या १० दिवसांपासून माध्यमांद्वारे अतिशय घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी आपल्याला विनंती आहे की माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करु नका, चौकशीत जे सत्य बाहेर निघेल ते आपल्याला समजेल.


हेही वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या; सत्तेच्या बळावर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न – प्रवीण दरेकर


गेल्या १५ दिवसांपासून कुठे होतात असा प्रश्न विचारला असता मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे की, मी गेल्या १५ नाहीतर १० दिवसांपासून आपल्या समोर आलो नाही. मी गेल्या १० दिवसांपासून कुटूंबासोबत होतो. त्यांचा सांभाळ करण्याचे आणि त्यांना समजावत होतो. पत्नीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. मी माझ्या मुंबईच्या घरी राहत होतो. घरात बसून मी माध्यमांद्वारे सर्व गोष्टींचा आढावा घेत होतो असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.

First Published on: February 23, 2021 2:20 PM
Exit mobile version