पोस्टर नहीं, इधर लाईव्ह शो चल रहा है; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून महिला आयोगावर निशाणा

पोस्टर नहीं, इधर लाईव्ह शो चल रहा है; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून महिला आयोगावर निशाणा

Chitra Wagh and Urfi Jawed Controversy | मुंबई – मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शीतयुद्ध अद्याप संपलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोघीही एकमेकींवर आगपाखड करत आहेत. उर्फीवर महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. मात्र, अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी कारवाई करून वेळ वाया घालवणार नाही, अशी भूमिका महिला आयोगाने घेतली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी आपला मोर्चा आता महिला आयोगाकडे वळवला आहे.

मराठी वेबसीरिज अनुराधाप्रकरणी महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली होती. धुम्रपान आणि अंगप्रदर्शनाला समर्थन केल्याचा संदेश दिला जात असल्याच्या कारणावरून ही नोटीस बजावण्यात आली होती. मग, उर्फीविरोधात कारवाई का केली नाही असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. पोस्टरमुळे चुकीचं संदेश जात असेल तर महिला आयोग कारवाई करतं. पण इथे तर लाईव्ह शो सुरू आहे. इधर पोस्टर नहींये, लाईव्ह शो चल रहा है. आणि हा लाईव्ह शो मुंबईच्या रस्त्यांवर सुरू आहे. मग मुंबईत चालणाऱ्या नंगानाचची महिला आयोग दखल का घेऊ शकत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा प्रेमाचं तर माहीत नाही, पण नंगानाच…; उर्फीचा नाव न घेता वाघांवर पलटवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही असा नंगानाच घडू देणार नाही. इथे विषय धर्माचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जिथे महिलांचा मान-सन्मान केला जातो, त्या महाराष्ट्रात, सार्वजनिक ठिकाणी हा नंगनाच चालू आहे या विकृतीला आमचा विरोध आहे. उर्फीला विरोध नाही, तिच्या नंगानाच्या विकृतीला आहे. आमचा विरोध चालूच असणार आणि आम्ही तो पूर्णत्वाला नेणार, असंही चित्रा वाघ म्हणाले.


कोणी काय कपडे घालावे किंवा घालू नये यावर आम्ही बोलू नये, असं अनेकजण म्हणाले. पण आधी कपडे तर घाला. मग ठरवू कोणी काय घालायचं आणि काय नाही ते. समाजाचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे, तिथे राजकारण महत्त्वाचं आहे का? समाजाच्या स्वास्थ्यापुढे राजकारणाची गरज नसते. पण तसं, दुर्दैवाने महाराष्ट्रात झालं नाही. या राज्यात सार्वजनिक ठिकाणी नंगानाच सुरू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, याचं उत्तर उर्फीचं समर्थन करणाऱ्यांनी द्यावं, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा – चित्रा वाघ पुन्हा चवताळल्या; व्हिडीओ शेअर करत महिला आयोगाला विचारला जाब

First Published on: January 5, 2023 5:05 PM
Exit mobile version