प्रकाश आंबेडकरांचं सोलापुरात शक्तीप्रदर्शन! उमेदवारी अर्ज दाखल

प्रकाश आंबेडकरांचं सोलापुरात शक्तीप्रदर्शन! उमेदवारी अर्ज दाखल

प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला

मोठ्या सस्पेन्सनंतर जाहीर केलेल्या सोलापुरातून प्रकाश आंबेडकरांनी अखेर सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दिला.

प्रकाश आंबेडकर प्रचार

सोलापुरात एरवी गजबज असणारा बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भरून गेला होता. पक्षाचं चिन्ह असलेले निळे झेंडे जागोजागी लावले तर होतेच. पण त्यासोबत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात देखील हे झेंडे असल्यामुळे सदर रस्ता पूर्णपणे निळा झाल्याचं चित्र यावेळी दिसत होतं. काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत आंबेडकरांनी आपला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.

प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून अर्ज दाखल केला

आंबेडकरांचं शक्तीप्रदर्शन शिंदेंसाठी त्रासदायक!

दरम्यान, अर्ज भरताना झालेल्या भारिपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पोटात नक्कीच गोळा उठला असणार. काँग्रेसच्या परंपरागत दलित आणि मुस्लीम मतदारांना आपल्याकडे वळवण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी होतात की शिंदे काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपकडून परत मिळवतात, हे निकालांनंतरच स्पष्ट होईल. मात्र, आज जमलेल्या गर्दीमुळे कसून मेहनत घ्यावी लागणार असल्याचा संदेश मात्र सुशीलकुमार शिंदेंपर्यंत नक्कीच पोहोचला असेल.


हेही वाचा – सोलापुरात त्रांगडं होणार; प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी जाहीर!
First Published on: March 25, 2019 7:20 PM
Exit mobile version