…तर तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल? पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

…तर तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल? पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

पुणे – एक जिल्हा सांभाळणं सोपं नाही, फडणवीस सहा जिल्हे सांभाळणार आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर अजित पवारांना आम्ही प्रशिक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या टीकेला अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे?  असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, अजित पवारांचे अब्दुल सत्तारांच्या टीकेला उत्तर

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे मुंडकी खाणारे डायानासोर होते, असा घणाघाती हल्ला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केला होता. त्यावर अजित पवार यांनी असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही. माझी मीडियाला हातजोडून विनंती आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. महागाईचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा होऊ नये म्हणून कोणी तरी काही तरी बोलत असते. त्यावर फोकस करू नका. ते बंद केले पाहिजे. वेदांतासारखा प्रकल्प गेला. दोन लाख लोक तरुण तरुणींना नोकरीला मुकावे लागले आहे. इतर प्रश्नांची सोडवणूक करा, असे माझे सत्ताधारी पक्षाला आवाहन आहे, असे अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांचे मत वैयक्तिक –

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेले सरस्वतीबाबतचे विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, असा खुलासा अजितदादांनी केला.

First Published on: September 30, 2022 12:16 PM
Exit mobile version