राज ठाकरे आठ दिवस कोकण-कोल्हापूरच्या दौऱ्यावर; निवडणुकांसाठी पक्षबांधणीला सुरुवात

राज ठाकरे आठ दिवस कोकण-कोल्हापूरच्या दौऱ्यावर; निवडणुकांसाठी पक्षबांधणीला सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. राज ठकरे यांच्या सभा आणि दौरे हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर (kolhapur – kokan visit) जाणार आहेत. यासंदर्भांत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत असणार आहे.

हे ही वाचा –  कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले

मनसेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ या दरम्यान राज ठाकरे कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर असणार आहेत.”

राज ठाकरेंच्या (raj thackeray) दौऱ्याला मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरुवात होईल. ते सर्वात आधी मुंबईहून कोल्हापूरला रवाना होतील. त्यानंतर तिथून ते सावंतवाडीला जातील. २९ नोव्हेंबरला त्यांचा मुक्काम कुडाळमध्ये असणार आहे. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दिपोलीत येऊन संपणार आहे.

एकूणच मनसेच्या या घोषणेवरून राज ठाकरे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बांधणीच्या कामासाठी सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे मनसेला आगामी निवडणुकांमध्ये किती फायदा होतो हे येत्या काळात सर्वानाच पाहायला मिळेल.

हे ही वाचा –  ‘महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होतेय, कोणी यावे टपली मारावी…’; उद्धव ठाकरेंची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

First Published on: November 24, 2022 8:46 PM
Exit mobile version