Vaccination : राजेश टोपे – मनसुख मांडविया भेट, बुस्टर डोस, दोन लसींमधील अंतर कमी करण्यावर झाली चर्चा

Vaccination : राजेश टोपे – मनसुख मांडविया भेट, बुस्टर डोस, दोन लसींमधील अंतर कमी करण्यावर झाली चर्चा

Vaccination : राजेश टोपे - मनसुख मांडविया भेट, बुस्टर डोस, दोन लसींमधील अंतर कमी करण्यावर झाली चर्चा

कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही डोसमधील अंतर ८४ दिवसावरुन २८ दिवसापर्यंत कसे करता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे. राजेश टोपे दिल्लीत असून केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज्यातील विषयांवर आणि कोरोनाच्या उपाययोजना तसेच लसीकरणाच्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्यासोबत राजेश टोपे चर्चा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीयांची भेट घेत कोरोना लसीकरणावर चर्चा केली आहे. केंद्रीय मंत्री मांडवीया यांची भेट घेतली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीर राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी एकूण ५ विषयांवर चर्चा केली आहे. यामध्ये सर्वच मागण्या प्रमुख असून यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे टोपे म्हणाले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणात अडथळा येऊ नये यासाठी अधिक लसीचा पुरवठा करण्यावरही चर्चा करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एकूण ५ विषयांवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्याच्यादृष्टीने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसावरुन २८ दिवसापर्यंत करता येईल का याचा फेरविचार करण्यात यावा. राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत विचार करण्यात यावा. तसेच मुलांच्या लसीकरणामध्ये १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण करण्याची सुरुवात करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड संबंधीत मनुष्यबळ उपलब्ध करणेसाठी निधी पुरवणी पी.आय.पी मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावा. राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सादर केलेल्या पी.आय.पी मध्ये कॅथलॅब चालु करण्याचा प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली नाही. तथापी, या संदर्भातील सुधारीत प्रस्तावास पुरवणी पी.आय.पी मध्ये मान्यता देण्यात यावी.


हेही वाचा : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा समोर, मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्धिकी यांचे सोनिया गांधींना पत्र


 

First Published on: November 16, 2021 4:31 PM
Exit mobile version