Rajya Sabha Election : राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होणार, BJPचे धनंजय महाडिक अर्ज भरणार?

Rajya Sabha Election : राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होणार, BJPचे धनंजय महाडिक अर्ज भरणार?

Rajya Sabha Election : राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होणार, BJPचे धनंजय माहाडिक अर्ज भरणार?

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) अर्ज दाखल करण्याची वेळ संपत येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. भाजपकडून (BJP) राज्यसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. धनंजय महाडिक उद्या अर्ज भरणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये सहाव्या जागेसाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. रविवारी दोन उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक यांच्या नावाला पसंती आहे.

भाजपने तिसरा उमेदवार दिला तर राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. मात्र, तूर्त आज भाजपने दिल्लीतून दोन उमेदवार दिले. तिसरा उमेदवार अधिकृतपणे घोषित केलेला नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात भाजपने उमेदवार दिला नाही तर निवडणूक बिनविरोध पार पडेल. धनंजय महाडिक यांना मुंबईला येण्यास सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईत राजकीय घडामोडी वेगवान होऊ शकतात.

राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढविणार असून या पक्षाने पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही. तर पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.


हेही वाचा : आमचे आमदार फुटले नाही, तुमचं नशीब फुटलंय ते बघा, राऊतांचा भाजपवर घणाघात

First Published on: May 29, 2022 9:00 PM
Exit mobile version