केंद्रात आठवलेंचं मंत्रीपद कायम; तर दानवेंची मंत्रीपदाची शक्यता

केंद्रात आठवलेंचं मंत्रीपद कायम; तर दानवेंची मंत्रीपदाची शक्यता

रावसाहेब दानवे

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाचा धुव्वा उडवत पुन्हा एकदा सत्तेवर स्वार झालेल्या मोदी सरकारने आता मोदी २ सरकारसाठी हालचाली सुरू केल्या असून, येत्या ३० मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचे मंत्री शपथ घेणार आहे. यासाठीच आज दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्व पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात यावेळी ८ मंत्रीपदे देण्यात येणार असून, भाजपला ५ तर शिवसेनेला ३ मंत्रीपदे मिळणार आहेत.

यांची खाती कायम राहणार

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांच्याकडे असलेली तीच खाती कायम ठेवली जाणार असल्याची माहिती मिळत असून प्रकाश जावडेकर आणि पराभूत होऊनही हंसराज अहिर यांना मंत्रीपद मिळणार आहे. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे देखील खाते कायम ठेवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देखील मंत्रीपद मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री मंडळात शपथ घेतली, अशी आशा त्यांच्या कार्यर्त्यांना वाटत आहे. अशा आशयाचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रावसाहेब दानवे

शिवसेनेकडून ही नावे पुढे येण्याची शक्यता

शिवसेनेकडून सध्या भावना गवळी, विनायक राऊत, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर यांचे नावे पुढे येत असून, यातील कुणाच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडते हे पहावं लागणार आहे.

First Published on: May 25, 2019 11:18 AM
Exit mobile version