पिंपरीतील शाळेच्या समिती अध्यक्षावर बलात्काराचा आरोप

पिंपरीतील शाळेच्या समिती अध्यक्षावर बलात्काराचा आरोप

दोन हजार रुपयांसाठी प्रियकराने उचलले भयानक पाऊल

पिंपरीतील प्रतिष्ठीत शाळेच्या समिती अध्यक्षाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हि महिला त्याच शाळेची मुख्याध्यापिका असून हा आरोप या मुख्यध्यापिकेनेच केलाचे उघड झाले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुणे मिररने हे वृत्त दिले आहे.

नेमके काय घडले?

पिंपरी येथे एक प्रतिष्ठीत शाळा आहे. या शाळेचे समिती अध्यक्ष २०१७ पासून महिला मुख्यध्यापिकेचा लैंगिक छळ करायचे. या अध्यक्षाने तिच्यावर बलात्कार देखील केला आहे. याविषयी तिने समितीमधील इतर सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र या मुख्यध्यापिकेच्या तक्रारीची कोणीच दखल घेतली नाही. मुख्यध्यापिकेवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करत मलाच नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचे मुख्यध्यापिकेने सांगितले. अखेर या महिलेने पिंपरी पोलिसात धाव घेत अध्यक्ष, शाळेचे पर्यवेक्षक, व्यवस्थापन समितीचे समन्वयक आणि विकास अधिकारी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

असे धमकवण्यात आले

या शाळेतील महिला मुख्यध्यापिका गेले १९९४ पासून शाळेमध्ये नोकरी करत आहे. या अध्यक्षाने गेल्या वर्षीपासून या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. १२ एप्रिल २०१८ रोजी अध्यक्ष माझ्या कक्षात आले आणि त्यांनी माझा पाण उतार केला. तसेच सांगितलेले ऐकले नाहीस तर पाचवी आणि नववीच्या मुलांना कॉपी करण्यासाठी कसे प्रोत्साहन दिले तो फोटो सार्वजिनक करण्याची त्यांनी धमकी दिली. असा आरोप महिला मुख्यध्यापिकेने अध्यक्षावर केला आहे.

पोलिसांची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ

या घडलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. ज्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्याकरता गेले हेते ते समाजातील प्रभावशाली लोक असल्यामुळे पोलीस एफआयआर नोंदवून घेत नव्हते. अखेर जुलै महिन्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे महिला मुख्यध्यापिकेने सांगितले आहे.

First Published on: August 29, 2018 9:30 PM
Exit mobile version