नोटांवर फक्त महात्मा गांधींचाच फोटो, रिझर्व्ह बँकेचा खुलासा

नोटांवर फक्त महात्मा गांधींचाच फोटो, रिझर्व्ह बँकेचा खुलासा

भारताच्या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोऐवजी नोबेल पारितोषिक विजेते थोर साहित्यिक रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो छापण्याची तयारी रिझर्व्ह बँकेकडून सुरू असल्याची चर्चा माध्यमांत सुरू होती. यावर खुलासा जारी करीत भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याऐवजी इतर कोणत्याही महापुरुषांचे फोटो छापण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधिन नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सोमवारी स्पष्ट केले.

काही चलनी नोटांवर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे वॉटरमार्क वापरण्याचा विचार सुरू असून त्यावर केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेत प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्यांच्या फोटोच्या नमुन्याचे दोन संच आयआयटी दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर यांना पाठवण्यात आले आहेत.

लवकरच काही सीरिजच्या नोटांवर हे फोटो दिसू शकतात, असे त्यात म्हटले होते. त्यावर रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी प्रसिद्धिपत्रक जारी करीत भारतीय चलनी नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून महात्मा गांधींऐवजी कोणाचाही फोटो नोटांवर वापरण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

First Published on: June 7, 2022 6:44 AM
Exit mobile version